Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीमध्ये 21 वर्षे झालं की दारु पिता येणार, नियम बदलण्याचं कारण काय?, केजरीवालांना सल्ला कोणी दिला?

दिल्लीमध्ये दारु पिण्यासाठीचे कायदेशीर वय 25 वर्षांवरुन 21 वर्ष करण्यात आल्यामुळे देशभरात दिल्ली सरकारच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. (delhi government liquor drinking age)

दिल्लीमध्ये 21 वर्षे झालं की दारु पिता येणार, नियम बदलण्याचं कारण काय?, केजरीवालांना सल्ला कोणी दिला?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 5:29 PM

दिल्ली : दिल्लीमध्ये दारु पिण्यासाठीचे कायदेशीर वय 25 वर्षांवरुन 21 वर्षं करण्यात आल्यामुळे देशभरात दिल्ली सरकारच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. एका समितीने केलेल्या शिफारशीनुसार दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला. हा निर्णय लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये दारू विक्रीसंदर्भातील नियम आणखी कडक होणार असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले आहे. (Delhi government made 21 year as legal age for liquor drinking what is reason behind it)

अनेक राज्यामध्ये दारू पिण्याचे वय 21 वर्षे

फक्त दिल्लीमध्येच दारु पिण्यासाठीचे कायदेशीर वय हे 21 वर्षे आहे असे नाही. तर देशातील गोवा, झारखंड, तेलंगाना आणि उत्‍तर प्रदेश या राज्यामध्येसुद्धा 21 वर्षे वय असलेल्यांना दारू पिण्यासाठी कायदेशीर मान्यता आहे. राजस्थान आणि पुदुच्चेरी येथे तर हे वय 18 वर्षे इतके आहे.

दारु पिण्यासाठी वय ठरवताना विशेष समिती

मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये दारू पिण्यासाठीचे वय बदलले जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, दिल्ली सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. तर एका समितीने दिल्ली सरकारला दारू पिण्याचे वय 21 वरुन 18 करण्याचा सल्ला दिला होता. दिल्ली सरकारने मागील वर्षात सप्टेंबर महिन्यात दारू विक्री आणि दारुचे सेवन याविषयी सूचना देण्यासाठी ही समिती नेमली होती. एक्साईज कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. याच समितीने दिलेल्या शिफारशीवरुन दारु पिण्याचे वय 25 वरुन 21 वर्षे करण्यात आलेय.

दारू पिण्याचे वय कमी करण्यासाठी याचिका

दारू पिण्यासाठीचे वय कमी करण्याचा निर्णय हा जरी दिल्ली सरकारने घेतला असला तरी, याआधी 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका करण्यात आली होती. कुश कालरा नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. कालरा यांनी या याचिकेत दिल्लीमध्ये मतदान करण्याचे वय हे 18 वर्षे आहे; मग दारू पिण्याचे वय हे 21 वर्षे का?, असा सवाल केला होता. तसेच, या याचिकेत दिल्ली एक्साईज अ‌ॅक्ट 2009 कायद्यातील कलम 23 रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. कलम 23 नुसार दारू पिण्याचे वय हे 21 वर्षे होते. हेच कलम रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती. या याचिकेनंतर सरकारने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. यावेळी दारु पिण्याचे वय कमी केले तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. युवकांवर त्याचा वाईट प्रभाव पडेल, असे सरकारने सांगितले होते. मात्र, शेवटी या मागणीसंदर्भात एक समिती स्थापन करुन पुढील निर्णय घेऊ असे सांगितले सरकारने सांगितले होते.

दारुतून दिल्ली सरकारला कोटींची कमाई

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. सरकारने दारू पिण्याचे वय 21 वर्षे केल्यामुळे यामध्ये आणखी भर पडू शकते. सन 2019-20 मध्ये दिल्ली सरकारला दारुविक्रीमधून तब्बल 5400 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरम्यान, दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या धोरणावर अनेकांनी टीकासुद्धा केलीआहे.

इतर बातम्या :

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात

‘फडणवीस मुंबईतून लक्ष ठेवतायत; शरद पवार, गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही’

(Delhi government made 21 year as legal age for liquor drinking what is reason behind it)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.