Hanuman Jayanti Delhi : हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवेळी दिल्लीत मोठा राडा, अनेक गाड्यांची तोडफोड, पोलीसही जखमी
दिल्लीच्या जहांगीर पुरीमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. जमावाकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. या राड्यात काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळतेय. हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येत होती, त्याचवेळी हिंसाचाराला सुरुवात झाली.
नवी दिल्ली : देशात सर्वत्र हनुमान जंयतीचा (Hanuman Jayanti) उत्साह आहे. महाआरती आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण यामुळे वातावरण भक्तीमय बनलं आहे. अशावेळी राजधानी दिल्लीत (Delhi) मोठा राडा पाहायला मिळाला. दिल्लीच्या जहांगीर पुरीमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. जमावाकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. या राड्यात काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळतेय. हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येत होती, त्याचवेळी हिंसाचाराला सुरुवात झाली. जमावाकडून वाहनांची तोडफोड सुरु करण्यात आली. राड्यानंतर पोलिसांची कुमक मागवण्यात आली. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला चढवला. सध्या घटनास्थळावर तणावाचं वातावरण आहे.
हनुमान जयंतीदिनी हिंसाचार
Stone pelting to Sword Welding – dangerous scenes unfold from North West Delhi’s Jahangirpuri. 1 policeman injured in Hanuman Jayanti Shobha Yatra Violence in the national capital.#DelhiViolence @pradip103 pic.twitter.com/Tei2P6Sw9L
— Jan Ki Baat (@jankibaat1) April 16, 2022
दिल्लीतील हिंसाचाराचे काही व्हिडीओ आता समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, हा राडा का झाला? दगडफेक कुणी केली? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिलाय. दरम्यान, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दिल्लीत सगळीकडे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिलीय.
हिंसाचारावेळी गोळीबार?
दिल्लीच्या जहांगीरपूरी भागात झालेल्या हिंसाचारावेळी गोळ्याही झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागल्याची माहिती राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. जखमी नागरिक आणि जखमी पोलिसांना जवळच्याच बाबू जगजीवनराव रुग्णालयात नेण्यात आलंय. हिंसाचारानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
Delhi | Heavy security deployed in the Jahangirpuri area after a clash between two groups. pic.twitter.com/srp5AZQuix
— ANI (@ANI) April 16, 2022
अरविंद केजरीवालांचं आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मी सर्वांता शांतता राखण्याचं आवाहन करतो. त्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय. तसंच दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असंही ते म्हणाले.
केजरीवालांचं शांततेचं आवाहन
I appeal to everyone to maintain peace as the country can not progress without it. Central govt has the responsibility to maintain peace in the national capital; appeal to people to maintain peace: Delhi CM Arvind Kejriwal on clash in Jahangirpuri pic.twitter.com/RMhmbnpmmf
— ANI (@ANI) April 16, 2022
इतर बातम्या :