AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi High Court : …तर पत्नीला लैंगिक संबंधाला नकार देण्याचा अधिकार नाही का? दिल्ली हायकोर्टाचा प्रश्न

एखादी सेक्स वर्कर सेक्सला नकार देऊ शकते तर पत्नी तिच्या पतीला सेक्सच्या बाबतीत नकार का देऊ शकत नाही, असा सवाल दिल्ली हायकोर्टानं केला आहे.

Delhi High Court : ...तर पत्नीला लैंगिक संबंधाला नकार देण्याचा अधिकार नाही का? दिल्ली हायकोर्टाचा प्रश्न
Delhi High Court
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 8:15 AM

नवी दिल्ली: दिल्ली हायकोर्टानं (Delhi High Court) वैवाहिक बलात्काराशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. एखादी सेक्स वर्कर सेक्सला नकार देऊ शकते तर पत्नी तिच्या पतीला सेक्सच्या बाबतीत नकार का देऊ शकत नाही, असा सवाल दिल्ली हायकोर्टानं केला आहे. पत्नीला सेक्स वर्करपेक्षा कमी अधिकार आहे का? सेक्सला नकार देण्याच्या पत्नीच्या अधिकारावर गदा का आणायची असा प्रश्न देखील दिल्ली उच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. यासंबंधी नवभारत टाईम्सनं वृत्त प्रकाशित केलं आहे.

दिल्ली हायकोर्टाची महत्त्वपूर्ण मतं

न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठापुढं वैवाहिक बलात्काशी संबंधित याचिकांवरील सुनावणी सुरु होती. या खंडपीठानं काही महत्त्वाची मतं नोंदवली आहेत. सेक्स वर्कर्सना देखील त्यांच्या ग्राहकांना नाही म्हणण्याचा अधिकार असतो. पती आणि पत्नी यांच्यातील संबंधाचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी पत्नीला तिच्या अधिकारापासून वंचित कसं ठेवता येऊ शकतं, असा सवाल न्यायमूर्ती शकधर यांच्यावतीनं करण्यात आले. याप्रकरणी नियुक्त करण्यात अ‌ॅमिकस क्युरी आणि ज्येष्ठ वकील राजशेखर राव यांचा युक्तिवाद देखील या स्वरुपाचा होता. एखाद्या महिलेवर जबरदस्ती केली जात असेल आणि ती सेक्स वर्कर असेल तरी अशा प्रकऱणातही त्या महिलेला व्यक्ती विरोधात आरोप करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद राजशेखर राव यांनी केला.

कलम 375 वर जोरदार चर्चा

दिल्ली हायकोर्टात भारतीय दंड विधान कलम 375 जे बलात्कारासंबंधीत घटनासंबंधी आहे त्यातील तरतुदींवर जोरदार चर्चा करण्यात आली. न्यायमूर्ती हरी शंकर यांनी यासंदर्भातील मतं मांडली. कलम 375 मध्ये बलात्काराला दंडनीय गुन्हा ठरवू नये असं म्हटलेलं नाही. कलम 375 चा मूळ हेतू हा महिलांना संरक्षण देण्याचा आहे. संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवण्याच्या घटनापासून हे कलम महिलांना संरक्षण देतं.याचा संदर्भ घेता विवाहित महिलेला विनासहमती केलेल्या लैंगिक संबंधामध्ये संरक्षण नाकरता येणार नाही, असं न्यायमूर्ती शंकर म्हणाले.

इतर बातम्या:

Pune Airport : आंतराराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरच्या जागेला संरक्षण विभागाचा नकार, भाजप आमदारांचा नव्या जागेचा प्रस्ताव

Bullock cart race| बैलगाडा शर्यतीबाबत उद्या सकारात्मक निकाल लागेल अशी आशा- आमदार महेश लांडगे

Delhi High Court ask question about wife right to say no physical relationship with husband

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.