JNU विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा हाणामारी, ABVP ने AISA, SFI नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप, अनेक जखमी
वसंतगंज पोलिस ठाण्यात त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. जेएनयूमध्ये कॅम्पसमध्ये डावे आणि एबीव्हीपी सदस्यांमधील हाणामारीचीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असल्याचे पोलीस म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना एम्स (AIIMS) आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कॅम्पसमध्ये 14 नोव्हेंबरला रात्री ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) संघटनांच्या सदस्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. वसंतगंज पोलिस ठाण्यात त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. जेएनयूमध्ये कॅम्पसमध्ये डावे आणि एबीव्हीपी सदस्यांमधील हाणामारीचीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असल्याचे पोलीस म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना एम्स (AIIMS) आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की ABVP आणि डाव्या सदस्यांनी नोंदवलेल्या तक्रारींची चौकशी चालू आहे आणि तथ्ये तपासल्यानंतर कारवाई सुरू केली जाईल. ABVP ने आरोप केला आहे की त्यांचे काही सदस्य विद्यार्थी कक्षात बैठक घेत होते तेव्हा काही डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी बैठकीत अडथळा आणला आणि नंतर हाणामारी झाली. ABVP ने म्हटले आहे की AISA आणि SFI च्या विद्यार्थ्यांनी ABVP च्या महिलांसह सदस्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या सदस्यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे.
ABVP’S GOONS UNLEASHED VIOLENCE IN JNU TODAY.
Time and again these criminals have unleashed violence on students and have disrupted campus democracy.
Will the JNU Administration still be silent ? Will no actions be taken on the goons ?
Photos of students attacked today. pic.twitter.com/ZnkjZ10Vhq
— Aishe (ঐশী) (@aishe_ghosh) November 14, 2021
मात्र, जेएनयू स्टुडंट्स युनियनची अध्यक्षा आणि SFI च्या सदस्या ऐशी घोष यांनी दावा केला की ABVP चे “गुंडांनी” डाव्या विद्यार्थ्यांवर पहिला हल्ला केला. या हल्ल्यावर जेएनयू प्रशासन गप्प बसणार का, असा सवाल तिने केला. तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर जखमी विद्यार्थ्यांचे फोटोही पोस्ट केले आहेत.
हे ही वाचा-