दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला; 2 हजार जिवंत काडतूसं जप्त; लाल किल्ल्याभोवती 10 हजार पोलीस तैनात
दिल्लीत काही ठिकाणी जिवंज काडतुसांचा पुरवठा करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आनंद विहार परिसरातून 2 बॅगांसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
नवी दिल्लीः देशाच्या राजधानीतून स्वातंत्र्यदिन दोन दिवसावर आला असतानाच दिल्लीतून 2 हजार जिवंत काडतूस (2 thousand live cartridges) पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. काडतुसांच्या दोन बॅगांसह 6 आरोपींनाही ताब्यात अटक करण्यात आले आहे. आनंद विहार (Anand Vihar Area) परिसरातून काडतुसांच्या दोन बॅगा आणि दोन पुरवठा करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांकडून आता कसून चौकशी करण्यात येत असून ही 2 हजार जिवंत काडतूसं कोणाला आणि दिल्लीतील (Delhi) कोणत्या भागात पुरवण्यात येत होती त्याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
Delhi Police have busted a syndicate involved in the smuggling of ammunition, recovered a huge quantity of ammunition including around 2000 live cartridges; 6 persons arrested. pic.twitter.com/rpaiG4upSl
— ANI (@ANI) August 12, 2022
त्या बरोबर आणखी दोन आरोपी सशस्त्रासह आनंद विहार परिसरात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. दिल्ली पोलिसांना आनंद विहारात सशस्र आणि जिवंत काडतुसांची माहिती मिळताच संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून 2 हजार जिवंत काडतुसांनी भरलेली बॅग जप्त करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यासोबत आणखी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
10 हजार पोलिसांचा फौजफाटा
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, 15 ऑगस्टच्या निमित्ताने लाल किल्ल्याभोवती 10 पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी पूर्ण दिल्ली शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी विविध सुरक्षा एजन्सीबरोबर चर्चा करुन दिल्लीतील सुरक्षा आणखी कडेकोट कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दहशतवादी संघटना सक्रिय
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी संघटनाकडून धोका असल्याचे सांगण्यात आले असून 15 ऑगस्ट रोजी आयबीकडून दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा
इंटेलिजन्स ब्युरोने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, जैश या दहशतवादी संघटनांकडून मोठ्या कटाच्या शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. आयएसआयची मदत घेऊन दहशतवादी संघटनांना स्फोट घडवण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दिग्गज नेत्यांच्या बंगल्यानाही कडेकोट बंदोबस्त देण्यात आला आहे.