TV9 EXCLUSIVE: खोट्या नोटांच्या धंद्यापासून सावधान, दिल्लीत 50 लाखांच्या बनावट नोटांसह भोजपुरी अभिनेत्याला अटक
नोटबंदी झाल्यानंतरही देशात खोट्या नोटांचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. बनावट नोटांचा धंदा आजही देशात जोरकसपणे सुरु असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
नवी दिल्ली : नोटबंदी झाल्यानंतरही देशात खोट्या नोटांचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. बनावट नोटांचा धंदा आजही देशात जोरकसपणे सुरु असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना दिल्लीत उघडकीस आलीय. एका भोजपुरी अभिनेत्यालाच 50 लाख रुपयांच्या खोट्या नोटांसह अटक झालीय. बनावट नोटांप्रकरणी कधी भारतातीलच लोकांना पकडलं जातंय, तर कधी देशाबाहेरील लोकांचाही समावेश असतो. यात शेजारी राष्ट्र पाकिस्तानसह बऱ्याच देशांचा समावेश आहे (Delhi police arrest Bhojpuri actor with fake currency notes of 50 lakhs).
दिल्ली पोलिसांना बनावट नोटांचं रॅकेट उघड करण्यात नुकतंच चांगलं यश मिळालंय. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (16 मार्च) याचा खुलासा केला. या कारवाईत दोघांना पकडण्यात आलंय. यात एका भोजपुरी अभिनेत्याचाही समावेश आहे. त्याच्याकडून 50 लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या. दिल्ली पोलिसांना बऱ्याच वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात राजधानी दिल्लीत खोट्या नोटा सापडल्या आहेत.
टीवी 9 सोबत बोलताना दक्षिण-पूर्व दिल्लीचे डीसीपी आर. पी. मीणा म्हणाले, “अटक करण्यात आलेल्या बनावट नोटा तस्करांची नावं मो. शाहिद उर्फ राज सिंह उर्फ लल्लन (25, बाटला हाउस, जामिया नगर, दिल्ली) आणि सैय्यद जेन हुसैन (जोगाबाई एक्सटेंशन, ओखला, जामिया नगर, दिल्ली) अशी आहेत.
बनावट नोटांची तस्करी करणारा आरोपी पाचवी पास
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या आरोपींमध्ये शाहिदचं शिक्षण केवळ पाचवी आणि सैय्यद जेन हुसैनचं शिक्षण 9 वी पास असं आहे. सैय्यद जेनची आधीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो आधी टॅक्सी ड्राईव्हरचं काम करत होता. मास्टरमाइंड मो. शाहिद दिल्लीत आश्रम परिसरात फिल्म स्टूडिओ चालवतो. त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे आधीपासूनच 8 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे या इतक्या मोठ्या प्रकरणाचा भांडाफोड जिल्ह्याच्या वाहन चोरी विरोधी पथकाने केलाय.
हेही वाचा :
तुमच्याकडील नोटा बनावट नाहीत ना? घरात नोटांचा छापखाना, मुंबईत 35 वर्षीय तरुणाला अटक
तुमच्या खिशातली नोट नकली तर नाही? मुंबईत नकली नोटा छापणारे अटकेत
अॅमेझॉन वरुन मागवले कलर प्रिंटर, घरातच बनवत होता बनावट नोटा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
व्हिडीओ पाहा :
Delhi police arrest Bhojpuri actor with fake currency notes of 50 lakhs