AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi police : ‘कौन है ये, मुझे नहीं देखा? वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी दिल्ली पोलिसांचा फंडा, देशभरात चर्चा, जाणून घ्या…

यापूर्वी 12 जुलैला दिल्ली वाहतूक पोलिसांनी NASA ची विश्वाची सर्वात खोल आणि तीक्ष्ण इन्फ्रारेड प्रतिमा शेअर केली होती. ज्याच्या शेजारी सीटबेल्ट घातलेल्या माणसाच्या छायाचित्रासह होते. दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर पोस्टला कॅप्शन दिले होते

Delhi police : 'कौन है ये, मुझे नहीं देखा? वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी दिल्ली पोलिसांचा फंडा, देशभरात चर्चा, जाणून घ्या...
दिल्ली पोलीसImage Credit source: tv9
| Updated on: Jul 17, 2022 | 1:02 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी (Delhi police) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये लाल ट्रॅफिक लाइटसमोरून म्हणजे सिग्नल तोडून एक कार जात असल्याचं दिसतंय. त्याच वेळी, नेट लाइटवर अभिनेत्री करीना कपूरचा चेहरा दिसतो आणि ती तोच प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसते… ‘यह कौन है, जिसने मुझे पलटकर नही देखा?’ वाहतूकीचं नियम तुटू नये, यासाठी दिल्ली पोलीस कठोर शिस्त लावतात, परिश्रम घेणारे दिल्ली पोलीस, तरीही काही वाहनचालक रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून लाल सिग्नल तोडताना दिसतात. त्यामुळे लोकांनी इशारे ऐकावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी (police) ‘पू’चा अवलंब केला आहे. लोकांना वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस अशा प्रकारचे उपक्रम हाती घेत असतात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून पोलीस लोकांना रस्ता सुरक्षेचा धडा शिकवण्याचं काम करतात. काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटूची जाहिरात लावून पोलिसांनी लोकांना ट्रॅफिकचे पालन करण्याबाबत जागरुक केले होते.

पाहा हा व्हिडीओ

लाल दिवा असूनही म्हणजेच सिग्नल लागलेलं असूनही एक कार सिग्नल तोडून निघून जाते, असं दिल्ली पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केलेलया व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. ज्यावर अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘पू’ चे पात्र ट्रॅफिकच्या लाल दिव्यात दिसत आहे. ज्यामध्ये तिचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, करीना ‘यह कौन है, जिसने मुझे पलटकर नही देखा?’ असे म्हणताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विट करून लिहिले की, वाहतूक नियम तोडणारा कोण? पू ला लक्ष देणे आवडते आणि ट्रॅफिक लाइटला देखील लक्ष हवे आहे.

यापूर्वीही मीम शेअर केला

यापूर्वी 12 जुलैला दिल्ली वाहतूक पोलिसांनी NASA ची विश्वाची सर्वात खोल आणि तीक्ष्ण इन्फ्रारेड प्रतिमा शेअर केली होती. ज्याच्या शेजारी सीटबेल्ट घातलेल्या माणसाच्या छायाचित्रासह होते. दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर पोस्टला कॅप्शन दिले होते, ‘तारे आणि चालान दिसण्यापासून टाळण्यासाठी सीट बेल्ट लावून वाहन चालवा’. मे महिन्याच्या सुरुवातीला हॅरी पॉटर डेच्या निमित्ताने दिल्ली पोलिसांनी जेके रोलिंगच्या मालिकेतील व्यक्तिरेखेची एक मेम शेअर केली होती. ज्यात लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.