Delhi Crime : चौथीच्या वर्गात घुसला, विद्यार्थीनींचे कपडे उतरवले, वर्गातच लघवीही केली! दिल्लीत कुणी केली लज्जास्पद कृती?

चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरानं संपूर्ण दिल्लीत खळभळ माजली आहे. हे विद्यार्थी वर्गात बसून शिक्षक येण्याची वाट पाहत होते.

Delhi Crime : चौथीच्या वर्गात घुसला, विद्यार्थीनींचे कपडे उतरवले, वर्गातच लघवीही केली! दिल्लीत कुणी केली लज्जास्पद कृती?
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:40 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून (Delhi Crime) एका शाळेत संतापजनक प्रकार घडलाय. चौथीच्या (4th std classroom) वर्गात एक अनोळखी व्यक्ती शिरली. ही व्यक्ती घाणेरडी कृत्य करण्याच्या इराद्यानं आली होती. दोन विद्यार्थींनीच कपडे या अज्ञान व्यक्तीनं उपतरले. त्यामुळे वर्गातली सगळेच बिथरले होते. त्यानंतर या व्यक्तीनं चौथीच्या वर्गामध्ये लघवी करण्यास सुरुवात केली. यानंतर ही व्यक्ती शाळेतून पसार झाली. धक्कादायक बाब म्हणजे ही संतापजनक घटना शाळेच्या प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जातोय. ही घटना दिल्लीतल्या भजनपुरा परिसरात असलेल्या एमसीडी शाळेतील आहे. 30 एप्रिल रोजी हा धक्कादायक (Girl abuse) प्रकार शाळेत घडला. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगानं आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले असून तातडीनं कारवाई करण्यासही सांगितलंय. विद्येच्या मंदिरात घडलेल्या या खळबळजनक घटनेनं संताप व्यक्त केला जातोय. ही शाळा दिल्लीच्या पूर्व भागात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर शाळा प्रशासन, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचं दिल्ली महिलाय आयोगानं म्हटलंय.

8 वर्षांच्या मुलीसोबत गैरप्रकार

चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरानं संपूर्ण दिल्लीत खळभळ माजली आहे. हे विद्यार्थी वर्गात बसून शिक्षक येण्याची वाट पाहत होते. त्यादरम्यान, हा सनसनाटी प्रकार घडला. या प्रकारानं सगळ्याच विद्यार्थ्यांना हादरवून सोडलं.

शिक्षण येण्याची वाट पाहत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गात एक अज्ञात इसम घुसला. तो घाणेरड्या भाषेत बोलू लागला. अश्लिल भाषेत बोलणाऱ्या या व्यक्तीनं 8 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य केलं. त्यानंतर सगळ्यांच्या समोरच या अज्ञात इसमानं लघवी करण्यास सुरुवात केली. जेव्हा विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना हा सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती महिला आयोगानं दिली आहे.

संशयिताचा शोध सुरु

ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर आता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. तर संशयिताचा शोधही घेतला जातोय. त्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं स्केचही तयार केलं आहे. स्केच जारी करत विद्यार्थ्यांकडून संशयिताचा शोध घेतला जातोय. पॉक्सो कायद्याअंतर्गत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.