दिल्ली ते सांगली, काय होतं बुरारी कांड जेव्हा एकाच कुटूंबातल्या 11 जणांनी सामुहिक आत्महत्या केली !

मुंबईः सांगली जिल्ह्यातील (Sangli Maharashtra) डॉक्टर असणाऱ्या कुटुंबातील दोघा भावांच्या कुटुंबीयांधील 9 जणांनी आत्महत्या (9 people suicide) केल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच सगळा देश हादरून गेला आहे. ज्या प्रमाणे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली होती, त्याचप्रमाणे बुरारीमध्येही अशीच एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या (burari 11 People Suicide) केली होती. त्यावेळी सगळा देशही […]

दिल्ली ते सांगली, काय होतं बुरारी कांड जेव्हा एकाच कुटूंबातल्या 11 जणांनी सामुहिक आत्महत्या केली !
दिल्ली ते सांगली, काय होतं बुरारी कांड जेव्हा एकाच कुटूंबातल्या 11 जणांनी सामुहिक आत्महत्या केलीImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:18 PM

मुंबईः सांगली जिल्ह्यातील (Sangli Maharashtra) डॉक्टर असणाऱ्या कुटुंबातील दोघा भावांच्या कुटुंबीयांधील 9 जणांनी आत्महत्या (9 people suicide) केल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच सगळा देश हादरून गेला आहे. ज्या प्रमाणे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली होती, त्याचप्रमाणे बुरारीमध्येही अशीच एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या (burari 11 People Suicide) केली होती. त्यावेळी सगळा देशही हादरून गेला होता. 2018 मध्ये दिल्लीबरोबरच सगळ्या देशाला हादरवून सोडणारी बुरारी कांड घडले होते.

दिल्लीसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बुरारी घटनेची त्या घटनेचा तपास झाल्यानंतर ती फाईल बंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी ज्यावेळी त्या घटनेचा सगळा घटनाक्रम न्यायालयात सांगितला होता, त्यावेळी मात्र अनेकांना धक्का बसला होता.

बुरारीमध्येही आत्महत्येचा करार

पोलिसांनी ज्यावेळी शेवटचा अहवाल न्यायालयात सादर केला त्यावेळी त्या अहवालामध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूचे कारण पोलिसांनी नोंद केले होते ते म्हणजे ‘आत्महत्या करार’. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, एका तांत्रिक विधीसाठी एका अख्ख्या कुटुंबालाच आपला जीव गमवावा लागला होता. 1 जुलै 2018 रोजी पोलिसांनी घर क्र.137/5/2 मधून एकामागून एक असे 11 मृतदेह बाहेर काढले होते. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक डायरीही सापडली होती. त्या डायरीमध्येच मग अनेक पुरावेही सापडले होते. त्या डायरीआधारेच अकरा जणांनी जी आत्महत्या केली होती, ती कशी होती आणि का करण्यात आली होती त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

विखुरलेले 11 मृतदेह

तीन वर्षांपूर्वी ज्या घरातून 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, त्या घरातील सगळ्यात ज्येष्ठ असणाऱ्या 77 वर्षीय नारायणी देवी यांचा मृतदेह एका खोलीत बेडवर पडलेला होता. उर्वरित मृतदेह दुसऱ्या खोलीच्या हॉलमध्येच लटकलेल्या अवस्थेत होते. त्याच कुटुंबातील आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे; प्रतिभा (57 वर्षे, नारायणी यांची मुलगी), हिचा मृतदेह खिडकीच्या ग्रिलला लटकलेला होता, प्रियंका (33 वर्षे, प्रतिभाची मुलगी), भवनेश भूपी (50 वर्षे, नारायणी यांचा मुलगा), सविता (48 वर्षे, भवनेश यांची पत्नी), नीतू (25 वर्षे, भवनेशची मुलगी), मेनका/मोनू (23 वर्षे, भवनेश यांची दुसरी मुलगी), धीरेंद्र/ध्रुव (15 वर्षे, भवनेश यांचा मुलगा), ललित (45 वर्षे, नारायणी यांचा मुलगा) टीना (42 वर्षे, ललित यांची पत्‍नी) तर शिवम/शिबू (15 वर्षे, ललित यांचा मुलगा)

मृतदेहांच्या डोळ्यांवर पट्टी

ही घटना जेव्हा घडली आणि 1 जुलै रोजी पोलीस सकाळी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांना प्रथम दर्शनी दिसले ते नारायणी देवी यांचा मृतदेह फरशीवर पडला होता.तर इतर कुटुंबातील व्यक्तींचे मृतदेह लोखंडाच्या ग्रीलला लटकलेले मिळालेले होते. त्या मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, तर हात आणि पाय दोन्हीही दोरीने बांधण्यात आले होते.

स्वतःला गळफास लावून घ्या

या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना त्या पोलिसांना घटनास्थळी एक डायरी मिळाली होती. त्यामध्ये या घटनेचा सविस्तर वृत्तांत लिहून ठेवण्यात आला होता. त्यामध्ये लिहिले कशा पद्धतीने स्वतःला गळफास लावून घ्यायचे आहेत त्याची माहिती लिहिण्यात आली होती.

मृत वडील मुलासोबत बोलतात

त्या डायरीआधारेच नंतर समजले होते की, 2007 मृत्यू झालेल ललितचे वडील त्याच्यासोबत बोलत असतात. आणि त्या डायरीतील सगळं लेखनही ललित आणि प्रियंकाच्या हस्ताक्षरातीलच होते. त्या डायरीमध्ये असेही लिहिले होते की, कुटुंबातील सगळ्यांच्या डोळ्यावर व्यवस्थित पट्टी बांधली पाहिजे, दोरी किंवा साडीचा त्यासाठी वापर करायचा.

पिंपळाच्या झाडाची पूजा

त्यानंतर सलग सात दिवस पिंपळाच्या झाडाची मनापासून पूजा करावी. ती पूजा करत असताना घरी कोणी आले तर दुसऱ्या दिवशी ती पूजा करा, आणि त्या कामासाठी गुरुवार किंवा रविवारचीच निवडा कार. याबरोबर त्या कुटुंबातील सगळ्यात ज्येष्ठ असणारी नारायणी यांना उभा राहता येत नाही म्हणून त्या दुसऱ्या खोलीतही थांबू शकतात असंही त्या डायरीमध्ये लिहिले होत.

‘महान शक्ती’ही प्राप्त करू शकणार

त्यावेळी पोलिसांनी एक गोष्ट नमूद केली होती ती म्हणजे, डायरी वाचल्यावर असे लक्षात आले होते की, ललितने आपल्या कुटुंबातील सगळ्यांना बाहेरील कोणत्याही व्यक्तींशी याबाबत चर्चा करू नये अशी सक्त ताकीदच दिली होती. नातेवाइकांनाही याबाबत काहीही न बोलण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावेळी ललितने कुटुंबातील सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली होती आणि तसे वचनही दिले होते की सर्वांनी त्याचे पालन केले तर तो ‘महान शक्ती’ही प्राप्त करू शकणार आहे.

एकमेकांचे बांधले हात

या गोष्टीमुळेच ललितच्या कुटुंबातील सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. आणि त्यांने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील फायदे-तोट्यांची गणितं त्यांनी घातली होती. ललित सांगितले होते की, ‘साधना’ संपल्यानंतर ललितने महिला आणि मुलांना एकमेकांचे बांधलेले हात उघडण्याची सूचनाही केली होती.

आत्मा सर्वांचे रक्षण करणार

ललितच्या सूचना सांगून झाल्यानंतर ललितसह सगळ्या कुटुंबाने देवाचे आभार मानण्यासाठी आणि त्याने सांगितल्याप्रमाणे शेवटची कृती करण्यासाठी तयार झाले होते. आपल्या वडिलांचा आत्मा सर्वांचे रक्षण करत असून त्यांनी कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मजबूत केले असल्याचेही त्याने सांगितले. त्यावेळी ललिल उदाहरणासह तो सगळ्यांना समजावून सांगत होता. त्याने वडीलांच्या निधनानंतर आपल्या एका दुकानाचे तीन दुकाने कशी झाली हे सांगत त्याने आपला व्यवसाय आपल्या मृत झालेल्या वडिलांमुळेच झाल्याचेही त्याने सांगितले आणि घरातील व्यक्तीनी त्याच्या बोलण्यावर विश्वासही ठेवला.

तोंडामध्ये ओल्या कपड्याचा बोळा

पोलिसांनी जी डायरी सापडली होती त्यामध्ये असंही लिहिण्यात आले होते की, मोक्ष प्राप्ताची ही प्रक्रिया 9 लोकांसह सुरू होईल. त्यासाठी बाळाला म्हणजेच प्रतिभाला मंदिराजवळील स्टूलवर उभे राहावे लागणार आहे. त्यानंतर 10 वाजता जेवणाची ऑर्डर येईल आणि आई आपल्याला सर्वांना रोट्या खायला देणार आहे. ही प्रक्रिया रात्री 1 वाजता सुरू होईल आणि त्यासाठी तोंडामध्ये ओल्या कपड्याचा बोळा घालावा लागेल, आणि आपापले हात डॉक्टरांच्या टेपने बांधून घ्यावे लागतील. हे करत असतानाच प्रत्येकाने स्वतःच्या कानातही कापूस ठेवावा लागणार असल्याचे डायरीत लिहून ठेवण्यात आले होते.

कोणीतरी वाचवणार असा विश्वास

एकाच कुटुंबात सुरू झालेली ही विधी 24 जूनपासून 30 जूनपर्यंत चालणार होती. ज्यावेळी फास गळ्यात अडकवण्यात येणार होता, त्यावेळी आपल्या जवळ पाण्याचा एक कपही ठेवण्यास सांगण्यात आले होते. सुचना मिळल्यानंतर त्या पाण्याचा रंग बदलत जाईल आणि तोच आपल्याला वाचवायला येईल असंही त्यामध्ये लिहून ठेवण्यात आले होत. डायरी वाचून पोलिसांनी ज्यावेळी तो घटनाक्रम सांगितला त्यावेळी ते म्हणाले की, महिला आणि मुलांना गळ्यात फास लटकवल्यानंतर स्टुलवरून उडी मारताच त्यांना कोणीतरी पकडणार असा विश्वास त्यांना होता. त्याचवेळी एका चिठ्ठीत असंही लिहिले होतं की, गळ्याला फास बांधण्याचं काम एकच व्यक्ती करेल. हात वेगळे आणि, तोंड वेगळे, 9 माणसे वेगळी बसतील आणि बाळाला म्हणजेच प्रियंकाला वेगळ्या स्टूलवर बसवण्यात येईल आणि आईसाठी वेगळी जागा असेल त्यावेळी ललित एका काठीने इशारा करेल असंही त्या डायरीत लिहिण्यात आले होते.

प्रश्न उपस्थित करायचे नाहीत

या विधीचा सगळा घटनाक्रम जेव्हा ललितने डायरीत लिहिला होता, त्यावेळी त्यामध्ये असंही लिहिलं होतं की, मृत पावलेल्या वडिलांच्या आदेशावर कोणताही प्रश्न उपस्थित केला तर सगळ्याचा सर्वनाश होईल. त्याच्या या इशाऱ्यालाच कुटुंबातील व्यक्ती घाबरल्या होत्या का असा सवालही पोलिसांनी केला होता. ललितनेही भाऊ भावनेशची मुलगी मनेका जेव्हा शाळेत पहिली आली तेव्हा तिचे श्रेयही ललितने आपल्याकडेच घेतले होते. या कुटुंबातील सर्व मुले तिमारपूर येथील वीरेंद्र पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती.

विधीनंतर आपण सहज बाहेर पडू

या कुटुंबातील मोबाईल फोनचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समजले की, कुटुंबातील सदस्यांनीच फोन ड्रॉवरमध्ये ठेवले होते आणि त्यानी ते गळफास घेण्याआधीच वापरले होते. हस्तक्षरांच्या तज्ज्ञानुसार सगळी डायरी प्रियंका आणि ललित यांची पत्नी टीना यांनीच लिहिले होती. शवविच्छेदनाच् अहवाल आला तेव्हा त्यामध्ये कुठेही विषबाधा किंवा अन्य कोणताही पुरावा त्यामध्ये आढळला नव्हता. मानसशास्त्राच्या तज्ज्ञांनुसार असे या घटनेचे असे विश्लेषण करण्यात आले की, त्यांना कोणालाच मरायचे नव्हते मात्र विधीप्रमाणे साधना केल्यावर आपण पुन्हा त्यातून सहज जगू शकेल असे त्यांना वाटले होते. ज्यावेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले तेव्हा कुटुंबातील 11 लोकांव्यतिरिक्त घरात अन्य कोणीही नव्हते.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.