KYC | फक्त दोन लाखापेक्षा जास्तीचं सोने खरेदीसाठी केवायसी बंधनकारक
आता एका निश्चित रकमेपर्यंत दागिने खरेदी केल्यास त्यावरील KYC ची अनिवार्यता सरकारने रद्द केली आहे.
मुंबई : जर तुम्ही सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा (Purchasing Jewellery Above Rs 2 Lakh Needs Mandatory KYC). सरकारने आता सोन्या-चांदीच्या खरेदीबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता एका निश्चित रकमेपर्यंत दागिने खरेदी केल्यास त्यावरील KYC ची अनिवार्यता सरकारने रद्द केली आहे (Purchasing Jewellery Above Rs 2 Lakh Needs Mandatory KYC).
त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होऊन सोनं खरेदी करु शकता. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, ज्या प्रकरणांमध्ये सोन्याच्या दागिण्यांच्या खरेदीचं मूल्य जास्त असेल, फक्त त्याच ग्राहकांना पॅन किंवा आधार कार्डसोबत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने 28 डिसेंबर, 2020 ला जारी केलेल्या एका अधिसूचनेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
याअंतर्गत, देन लाख रुपयांपेक्षा जास्तीचे दागिने, सोना-चांदी किंवा रत्न आणि मौल्यवान दगड खरेदी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचं असेल. हे नियम गेल्या काही वर्षांपासून लागू करण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या मूल्याचे रत्न किंवा दागिने खरेदी करताना ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सोने-चांदी किंवा इतर मुल्यवान दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकवेळी त्यांची ओळख सांगणे म्हणजेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं नाही.
बँकेत आणि आर्थिक संस्थांमध्ये केवायसी अत्यंत महत्त्वाची असते. कारण, या प्रक्रियेमुळे ग्राहकाची ओळख सुनिश्चित होते. त्यानंतर फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.
Gold Silver price Update : सोन्याचा भाव उतरला, चांदीही घसरली; जाणून घ्या दर…https://t.co/8dfp7NvM5L#gold #goldrate #silver #silverprice
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
Purchasing Jewellery Above Rs 2 Lakh Needs Mandatory KYC
संबंधित बातम्या :
Gold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर
Gold Silver Price today: मुंबई पुण्यात 7 दिवसांमध्ये सोन्याला झळाळी, आजही दर वाढले