पंजाबच्या राजकारणात दलितांचं स्थान काय?; आंबेडकरी विचारांचा प्रभाव किती?

चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा मास्टर स्ट्रोक मारला आहे. (Despite Strength in Numbers, Why Are Dalits Not Politically Empowered?)

पंजाबच्या राजकारणात दलितांचं स्थान काय?; आंबेडकरी विचारांचा प्रभाव किती?
punjab dalit
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 6:59 PM

चंदीगड: चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यानिमित्ताने पंजाबचं राजकारण, जातीव्यवस्था, दलितांची संख्या, त्यांचं राजकारण आणि एकूण पंजाबच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे. पंजाबच्या राजकारणात दलित कुठे आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश. (Despite Strength in Numbers, Why Are Dalits Not Politically Empowered?)

पहिलाच दलित मुख्यमंत्री

देशात सर्वाधिक दलितांची संख्या पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये दलित लोकसंख्येच्या 32 टक्के आहेत. मात्र, राजकीय जाणिवेचा अभाव आणि दलितांचा सर्वंकष असा राजकीय पक्ष नसल्याने स्वातंत्र्याच्या 74 वर्षात एकही दलित नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही. चरणजीतसिंग चन्नी हे पहिलेच दलित मुख्यमंत्री आहेत.

रिपब्लिकन पक्ष ते बसपा

पंजाबमध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठी व्होटबँक होती. 1967च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंने पंजाबमध्ये एकूण 17 जागा लढविल्या होत्या. नंतर पंजाब विधानसभेला रिपाइंने 17 उमेदवार उतरविले होते. त्यापैकी रिपाइंचे 3 उमेदवार निवडून आले होते. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीनंतर रिपाइंच पंजाबमधील अस्तित्व संपुष्टात आलं. नंतर हा संपूर्ण दलित व्होटर काँग्रेसची व्होटबँक झाला. 80च्या दशकात कांशीराम यांनी बसपाची स्थापना केली. आधी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. नंतर त्यांनी बसपाची स्थापना केली. मात्र, पंजाबमधील असूनही कांशीराम यांनी आपलं कार्यक्षेत्रं पंजाब न निवडता उत्तर प्रदेश निवडलं. उत्तर प्रदेशात दलित चळवळ मजबूत केल्यानंतर त्यांनी पंजाबकडे मोर्चा वळवला होता.

आंबेडकरांचा सर्वाधिक प्रभाव

पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव प्रचंड आहे. पंजाबच्या गावागावांमध्ये शहरातील मुख्य ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे आहेत. दलित शीखांमध्ये आंबेडकरवाद मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय अनेकांनी बौद्ध धर्माचाही स्वीकार केला आहे. रविदास समाजाच्या गुरुद्वारांमध्ये तर गुरु ग्रंत साहिब, रविदासांची प्रतिमा आणि डॉ. आंबेडकरांचा फोटो सर्रासपणे पाहायला मिळतो. दलित समाज बाबासाहेबांना मानतो. पण पाहिजे त्या प्रमाणावर इथल्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला नाही. कारण बौद्ध धर्माकडे या लोकांना नेणारा दुसरा नेताच नंतर निर्माण झाला नाही.

पंजाबमध्ये सुरुवातीला रिपब्लिकन पक्ष, नंतर दलित पँथर आणि नंतर बसपाचं वर्चस्व राहीलं. त्यामुळेही इथल्या दलितांवर बाबासाहेबांचा प्रभाव राहिला आहे. मात्र, असं असलं तरी राजकीय दृष्ट्या दलित समाज एकत्र येऊ शकला नाही.

संख्याबळ सर्वाधिक तरीही सत्तेपासून दूर का?

पंजाबमध्ये दलितांची लोकसंख्या 32 टक्के आहे. तरीही ते सत्तेपासून दूर राहिले आहेत. 74 वर्षानंतर पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री झाला. त्यासाठी इतके वर्ष का लागली? त्याला कारणंही तशीच आहे. समाजशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक मनजित सिंग यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीनुसार, वर्चस्वादी जातींनी पैशाच्या बळावर सत्तेवर मांड ठोकली आहे. शिक्षण आणि समाजातील त्यांच्या उच्च स्थानामुळे ते कायम सत्तेत राहिले आहेत.

पंजाबच्या 117 राखीव जागांपैकी 34 जागा राखीव आहेत. तरीही दलित समाजातील नेत्यांना कोणत्याही सरकारच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं दिलं गेलं नाही. अर्थात काही नेत्यांची प्रगती झाली आहे. पण काही नेत्यांची प्रगती झाली म्हणजे दलित समाज पुढारला असं होत नाही, असं मनजित सिंग म्हणाले.

तर पंजाबमध्ये दलित समाजातील वर्ग हा मजूर वर्ग आहे. ते रोजंदारीवर काम करतात. त्यांच्याकडे स्वत:ची शेती नाही. व्यवसायही नाही. त्यामुळे त्यांच्यात राजकीय जागृतता नाही. त्यामुळेच दलित समाज सत्तेत जाऊ शकला नाही, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

शिखांमध्येही जातीव्यवस्था

हिंदू धर्मातून अनेकांनी धर्मांतर करत शीख धर्मात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिखांमध्ये हिंदू धर्माप्रमाणेच जाती व्यवस्था आली आहे. मात्र, शिखांमधील जातीव्यवस्था अत्यंत कडवट अशी नाही, यावर अनेक विचावरंतांचं एकमत आहे. पंजाबमध्ये जाती हा मुद्दा केवळ राजकारणापुरता राहिला आहे. व्यवहारात त्याची तीव्रता तेवढी तीव्र राहिलेली नाही, असंही सांगितलं जातं.

शीख धर्म, जाती आणि लंगर

शीख धर्म समतेचा पुरस्कर्ता आहे. मात्र, अजूनही शीख धर्मीयांना संपूर्ण समता प्रस्थापित करता आलेली नाही. गुरबानीचा अभ्यास केला तर त्यात शीख धर्मात जातीव्यवस्था नसल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. मात्र, व्यवहारिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असं ज्येष्ठ विचारवंत डॉ. हरीश पुरी यांनी द प्रिंटशी बोलताना सांगितलं. शिखांच्या आदिग्रंथ या ग्रंथात जातीव्यवस्थेवर प्रचंड टीका करण्यात आलेली आहे. त्यामुळेच लंगरमध्ये सर्वांना एकाच रांगेत बसायला सांगितलेले आहे. उच्चनीच हा भेद पाळला जाऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशिष्ट शीख लंगरची उत्पत्तीच मुळात जातीव्यवस्थेच्या विरोधात झाली आहे. शीख धर्मीयांनी जातीव्यवस्था नाकारली हे त्यांच्या कडा प्रसादातूनही दिसतं. हा कडा प्रसाद सर्व मिळून तयार करतात आणि एकमेकांना वाटतात.

आंतरजातीय विवाह

शीख समाजातील दोन क्षेत्र असे आहेत की त्यात जातीव्यवस्था पाहायला मिळते. शिखांमध्येही साधारणपणे आपल्याच जातीत विवाह करण्याचा सल्ला दिला जातो. शीख समाजात आंतरजातीय विवाह अभावानेच होतात. बहुतेकदा जाती जातीतच लग्न लावण्यावर अनेक जातींचा भर असतो. जाट समाजातील विवाह जाट समाजातच होतो. खत्री समाज खत्रींमध्ये लग्न सोहळे करतात. तर दलिताचा विवाह दलित मुलीशीच होतो. काही जातींनी तर आपल्या जातीचे गुरुद्वारही बांधले आहेत. रामगढिया जातीचे लोक आपल्या पद्धतीने गुरुद्वारा बनवतात. विशेष करून ब्रिटनमधील रामगढिया समाजातील लोक हे करतात. दलितांमध्येही हेच पाहायला मिलते. पंजाबात अनेक गावात तर दलितांचे प्रार्थनास्थळ आणि अंत्यसंस्काराच्या जागाही वेगळ्या असतात. ते जाट शिखांच्या गुरुद्वारांमध्ये प्रार्थना करू शकतात, पण दुसऱ्या उपासकांच्या लंगरमध्ये आणि सामुदायिक स्वयंपाकगृहात थांबू शकत नाहीत. एवढेच काय दलितांना तर तेथील भांड्यांना स्पर्श करण्याचाही अधिकार नाही.

संख्या कमी पण प्रभावी अधिक

60 टक्के शीख जाट हे जातीशी संबंध ठेवतात. ही एक ग्रामीण जात आहे. तर खत्री आणि अरोडा या व्यापारी जाती आहे. त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. मात्र, त्यांचा शीख समाजात मोठा प्रभाव आहे. तसेच रामगढिया (कारीगर), अहलुवालिया (दारू बनविण्याशी संबंधित) आणि दोन दलित जाती आहेत. त्यांना मजहबी (चुहरा) आणि रामदासिया (चर्मकार) नावाने ओळखलं जातं.

जातीचं गणित काय?

सरकारी संकेतस्थळानुसार पंजाबमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात 32 टक्के दलित समाज आहे. दलितांच्या लोकसंख्येपैकी 59.9 टक्के शीख आणि 39.6 टक्के हिंदू आहेत. उच्च जातीच्या जाट शिखांची संख्या कमी आहे. मात्र, राजकारणात आणि अर्थकारणात त्यांचा दबदबा आहे. जाट शेतकऱ्यांमध्ये राज्यातील सर्वाधिक शेती आहे. दलितांकडे केवळ 6.2 टक्के शेती आहे. पंजाबमध्ये 523,000 कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यात 321,000 म्हणजे सुमारे 61.4 टक्के दलित आहेत.

पॉप आणि रॅपमधून विद्रोह

महाराष्ट्रात शाहिरांनी जशी विद्रोही गाणी गाऊन जनजागृती केली. तसेच आंबेडकरी जलश्यातून प्रबोधन केलं. तसं पंजाबमध्ये पॉप आणि रॅप गाण्यातून प्रबोधन केलं जात आहे. दलित रॅप म्हणून हा प्रकार पंजाबमध्ये लोकप्रिय आहे. गिनी माही या रॅप सिंगरने दलित रॅप सर्वाधिक लोकप्रिय केला आहे. तिने तर परदेशात जाऊनही दलित रॅपचे कार्यक्रम केले आहेत. डेंजर चमार हा तिचा अल्बम प्रसिद्ध आहे. (Despite Strength in Numbers, Why Are Dalits Not Politically Empowered?)

संबंधित बातम्या:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर

चरणजीतसिंग चन्नी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सोबत दोन मंत्र्यानाही दिली शपथ; पुढचा प्लॅन काय?

मुख्यमंत्री बनण्यासाठी हत्तीची सवारी, ते टॉस उडवून शिक्षकांची निवड, कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी?

(Despite Strength in Numbers, Why Are Dalits Not Politically Empowered?)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.