बिहारमध्ये दारुबंदी, पण 55 हजार महिला आणि 10 लाख लोक दारुच्या आहारी, तर 11 लाख लोकांना लागते भांग!
सामाजिक न्याय विभागामार्फत जारी एका राष्ट्रीय सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार 10 लाख लोक दारुच्या आहारी गेल्याचं सांगण्यात आलं आहे. फक्त पुरुषच नाही तर 55 हजार महिलांचाही यात समावेश असल्याचं या अहवालात म्हटलंय.
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2020 मध्ये राज्यात कडक निर्बंध लागू करत दारुबंदीची घोषणा केलीय. त्यामुळे बिहारमध्ये तसं पाहिलं गेलं तर दारु विक्री आणि दारु पिण्यावर बंदी आहे. पण राष्ट्रीय स्तरावरील एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आलीय. सामाजिक न्याय विभागामार्फत जारी एका राष्ट्रीय सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार 10 लाख लोक दारुच्या आहारी गेल्याचं सांगण्यात आलं आहे. फक्त पुरुषच नाही तर 55 हजार महिलांचाही यात समावेश असल्याचं या अहवालात म्हटलंय.(Despite the ban in Bihar, 10 lakh people are addicted to alcohol)
मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीच्या नॅशनल डिपेंडन्स ट्रिटमेंटने तयार केला आहे. बिहारमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. बिहारमध्ये सध्या 10 लाखपेक्षा जास्त लोक दारुच्या आहारी गेले आहेत. तर 11 लाख लोक नशा करण्यासाठी भांगेचा वापर करतात. तर बिहारमध्ये 1.3 लाख लोक इनहेलेंट्सच्या आहारी गेले आहेत.
बिहारमध्ये ‘नशा मुक्त भारत अभियान’ सुरु होणार
बिहारचे समाजकल्याण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नशा करता येणारी औषधं आणि पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा लोकांना नशेपासून दूर करण्यासाठी बिहार सरकार एक अभियान हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारला व्यसनमुक्त करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत अभियान’ सुरु करण्यात आलं आहे. या अभियानासाठी राजदूत म्हणून सायकल गर्ल ज्योती कुमारी हिची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली आहे.
व्यसनामुळे गुन्ह्यांमध्येही वाढ
बिहारमध्ये दारु बंदी करण्यात आली असली तरी लोक अन्य मार्गाने व्यसन करत आहेत. वसनाच्या आहारी गेलेले काही लोक राज्यात चोरी आणि मानवी तस्करीसारखे गुन्हे करत असल्याची धक्कादायक माहितीही या अहवालातून समोर आली आहे.
इतर बातम्या :
Indian Railway : पहिला वातानुकूलित थ्री टियर इकॉनॉमी क्लास डबा प्रवाशांच्या सेवेत
मोदी सरकारचा WhatsApp च्या New Privacy Policy ला विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात ‘ही’ मागणी
Despite the ban in Bihar, 10 lakh people are addicted to alcohol