फडणवीस, चंद्रकांत पाटील दिल्लीत, बीएल संतोष यांच्यासोबत खलबतं; महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

| Updated on: Nov 26, 2021 | 2:15 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीत आहेत. भाजपचे नेते बीएल संतोष यांच्याशी त्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे.

फडणवीस, चंद्रकांत पाटील दिल्लीत, बीएल संतोष यांच्यासोबत खलबतं; महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?
chandrakant patil
Follow us on

नवी दिल्ली: भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्लीत आहेत. भाजपचे नेते बीएल संतोष यांच्याशी त्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये भाजपच्या मुख्यालयात दोन तास चर्चा झाली. राज्यातील महापालिका निवडणुकांची रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी काल भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर आज पुन्हा पाटील आणि फडणवीस यांनी बीएल संतोष यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांमध्ये पक्ष कार्यालयात चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. तसेच संघटनात्मक बांधणीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

म्हणून भेट महत्त्वाची

भाजपने गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पातळीवर अनेक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशभरातील अनेक राज्यातील नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून पंकजा मुंडे यांची केंद्रीय कार्यकारिणीत वर्णी लावण्यात आली होती. आता विनोद तावडे यांच्याकडे महासचिवपद देण्यात आलं आहे. तर, चंद्रशेखर बावनकुळे आणि राजहंस सिंह यांना विधान परिषद देण्यात आली आहे. राज्यातील संघटन मजबूत करण्यासाठी हे फेरबदल केले असल्याचं सांगितलं जात आहे. हे फेरबदल करण्यात आलेले असतानाच फडणवीस आणि पाटील यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने या बैठकीला महत्त्व आलं आहे.

पाटील-शहा भेट

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्येही दोन तास चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. यावेळी पाटील यांनी शहा यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही पाटील यांनी शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शरद पवार दिल्लीत

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा दिल्लीत आहेत. संरक्षण खात्याच्या समितीने आयोजित केलेल्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत आले आहेत. पवारांचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे ते सकाळीच दिल्लीकडे रवाना झाल्याचं सांगण्यात आलं.

 

संबंधित बातम्या:

SHARAD PAWAR : शरद पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीत दाखल, संरक्षण समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार

मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार, नारायण राणेंनी सांगितली नवी तारीख

देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना डावललं त्यांना पुन्हा संधी; भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?