‘बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा’, बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली (Devendra fadnavis on bihar election result 2020).

'बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा', बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 1:03 AM

मुंबई : “बिहारच्या जनतेला जंगलराज नको, तर विकास हवा आहे. हे त्यांनी या निवडणुकीतून सिद्ध केलं आहे. या निवडणुकीने आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणखी एक मोहर लागली आहे. बिहारच्या जनतेने बिहारचे मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला आहे. मी बिहारच्या जनतेचं कोटी कोटी अभिनंदन करतो. त्यांना अभिवादन करतो”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली (Devendra fadnavis on bihar election result 2020).

“भाजपने बिहारमध्ये 110 जागांवर निवडणूक लढली. यापैकी जितक्या जागांवर विजय मिळाला त्याचं प्रमाण 67 टक्के इतकं आहे. हे प्रमाण 2015 च्या निवडणुकीत फक्त 34 टक्के होतं. याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदीचं गरिब कल्याण अजेंडा आणि कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना जातं. मी भाजपच्या बिहारच्या टीमचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.

“देशातील 11 राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. बिहारसह या राज्यांमध्येही पंतप्रधान मोदींवर विश्वासाची लहर आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगना तसेच इतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन”, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra fadnavis on bihar election result 2020).

बिहारच्या जनतेचं पंतप्रधान मोदींकडून आभार

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. “बिहारच्या युवा पिढीने सिद्ध केलंय की, नवं दशक हे बिहारचं असेल. बिहारच्या युवकांनी एनडीएच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे. या युवा ऊर्जामुळे एनडीएला आणखी परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे”, असं मोदी म्हणाले आहेत.

संबंधित बातमी : जनतेनं एनडीएला दिलेलं समर्थन अद्भुत, देशाची दिशाभूल करणाऱ्यांना धडा मिळाला : अमित शाह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.