नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? दिल्लीत राजकीय गाठीभेटी?; धनंजय मुंडे यांनी काय काय सांगितलं?
Dhananjay Munde Reaction On Resign : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरत आहे. पण काल धनंजय मुंडे यांनी आक्रमक बाजू मांडली. आज ते त्यांच्या विभागाच्या कामानिमित्त दिल्लीत दाखल झाले.
![नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? दिल्लीत राजकीय गाठीभेटी?; धनंजय मुंडे यांनी काय काय सांगितलं? नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? दिल्लीत राजकीय गाठीभेटी?; धनंजय मुंडे यांनी काय काय सांगितलं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Dhananjay-Munde-Reaction-On-Resign.jpg?w=1280)
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह महायुती सरकारवर त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. काल त्यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी चर्चा रंगली होती. तर मुंडे यांनी याविषयी आक्रमक बाजू मांडली. त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आज ते त्यांच्या खात्याच्या कामासाठी दिल्लीत दाखल झाले होते. खासदार संजय राऊत यांनी ते पदा वाचवण्यासाठी दिल्लीला गेल्याचा आरोप केला होता. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? या मुद्दावर मुंडे यांनी असे उत्तर दिले.
या शतकात काहीही लपून राहत नाही
मुख्यमंत्री दिल्लीत येणार हे मला दिल्लीला येताना माहीत नव्हतं. दिल्लीत आल्यावर कळालं. विषय फक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्या प्रल्हाद जोशींकडे मांडल्या. सर्वांना रेशन मिळेल यावर आमची चर्चा झाली. राजकीय विषय असते तर माझ्या आधी तुम्हाला कळालं असतं. मला काय ठरवायचं हे तुम्हालाच आधी कळलं असतं. २१व्या शतकात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Budget-2025-live-Streaming.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Manoj-Jarange-Patil-big-appeal.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Eknath-Shinde-group-Palghar-leader-Ashok-Dhodi-missing.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Dhananjay-Munde-on-Resign-1.jpg)
आरोपींना फाशी द्या
५१ दिवसात मी एकच गोष्ट बोललोय की, सरपंच देशमुख यांची हत्या झाली. त्या सर्व, जे दोषी असतील, त्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांना मोठ्यातील मोठी शिक्षा द्या ही आपली मागणी आहे असे मुंडे म्हणाले. कोण किती दिवस फरार आहे, तुम्ही माझ्यावर ट्रायल करत असाल तर मी त्या गोष्टीवर बोलू नये, असे मुंडे म्हणाले.
माझ्याविरोधात ट्रायल
धनंजय मुंडे या सर्व गोष्टीत मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कुठे दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा. मी राजीनामा देईल. फक्त विषय काढला जात आहे. मी दोषी आहे की नाही हे सीएम आणि उपमुख्यमंत्री सांगतील, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिले. ५१ दिवस ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी निष्ठावंत आहे. निवडणुकीत जिथे जाईल तिथे माझ्या पक्षाचा प्रचार करेल. आपण निवडणुकीत टीका करतो आणि टीका सहनही करतो. पुन्हा राग नसतो. माझ्या विरोधात प्रचाराला होते म्हणून आपण असं करावं हे योग्य नाही, असे उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.
नैतिकतेवर राजीनामा देणार?
माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय. त्याबाबत मी जे बोललो ते प्रामाणिक बोललो. मी नैतिकतेत दोषी आहे असं मला वाटत नाही. माझा दोष माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अजित पवार, बीडला पहिल्यांदाच येत आहे. ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं. उद्या पहिलीच मिटिंग आहे. डीपीडीसीची बैठक आहे. त्यामुळे फारशी तयारी नाही. अभूतपूर्व स्वागत केल्यावर उद्या काय बातम्या येईल हे मला माहीत आहे. त्यामुळे मी फारशी तयारी केली नाही, असे पण मुंडे म्हणाले.