Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले दिल्ली, काय होता वायू गुणवत्ता दर?

दिवाळीच्या दिवशी दिल्ली जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले. फटाक्यांमुळे दिल्लीची हवा विषारी झालेली आहे.

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले दिल्ली, काय होता वायू गुणवत्ता दर?
दिवाळीत दिल्लीची हवा विषारी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 10:49 AM

दिल्ली, देशाची राजधानी असलेली दिल्ली (Delhi) दिवाळीच्या दिवशी (Diwali 2022) जगातल्या प्रदूषणाची राजधानी ठरली. दिल्लीतील प्रदुषणाची पातळी (Pollution Lavel) आधीच वाढलेली आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. यानंतर पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या स्थानावर होते. दिवाळीत दिल्लीचा AQI 312 वर होता. शहराने 2018 मध्ये 281 AQI नोंदवले होते.

गतवर्षीच्या तुलनेत किंचित सुधारणा

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत दिल्लीत कमी प्रदूषण होते ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत दिल्लीचा AQI 382 होता. तर 2016 मध्ये AQI 431 होता.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूटचे चेअर प्रोफेसर गुफ्रान बेग म्हणाले की, राजधानीतील हवेची गुणवत्ता मंगळवारी गंभीर झोनमध्ये घसरू शकते, परंतु वाऱ्याचा वेग आणि दुपारी उष्ण वातावरण सुधारल्याने प्रदूषकांचे विखुरले जाण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

दिल्लीच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती कशी होती हे  जाणून घेऊया.

गाझियाबादमध्ये AQI 301 होता नोएडा मध्ये 303 ग्रेटर नोएडा मध्ये 270 गुरुग्राममध्ये 325 फरिदाबादमध्ये २५६

हवेची गुणवत्ता पातळी

AQI कोणत्या श्रेणीमध्ये तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो हे जाणून घेऊया. शून्य ते 50 मधील AQI ‘चांगला’ मानला जातो. तर 51 ते 100 ‘समाधानकारक’ मानले जातात. तर 101 ते 200 ची’मध्यम आणि 201 ते 300 घातक श्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या शहराचा AQI 301 ते 400 च्या दरम्यान असेल तर तेथील हवा विषारी  असते. आणि 401 ते 500 अति गंभीर मानले जातात.

हिवाळा सुरू झाला की देशातील मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावू लागते. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसतो, जिथे हवा अशा प्रकारे विषारी होते की, लोकांना श्वास घेणे कठीण होते. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेही हवेतील प्रदूषण झपाट्याने वाढते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.