सर्जरी करण्यापूर्वी डॉक्टरच झाला बेहोश, ऑपरेशन थिएटरमध्ये असं नेमकं काय घडलं?
सकाळी जवळपास आठ वाजता अॅनिस्थेशिया देण्यात आला. दुपारी दोन वाजता सर्जरी करण्यात येणार होती. ऑपरेशन सुरू होणार तेवढ्यात डॉक्टरच बेहोश झाले.
बेंगळुरू : कर्नाटकमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली. एक डॉक्टर सर्जरी करण्यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत सापडला. बालकृष्ण असं या मद्यधुंद डॉक्टरचे नाव. ज्या दिवशी रुग्णांची सर्जरी होणार होती, त्या दिवशी ऑपरेशन थिएटरच्या आत डॉक्टर सकाळी बेहोश दिसला. या घटनेनंतर डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सकाळी जवळपास आठ वाजता अॅनिस्थेशिया देण्यात आला. दुपारी दोन वाजता सर्जरी करण्यात येणार होती. ऑपरेशन सुरू होणार तेवढ्यात डॉक्टरच बेहोश झाले.
डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये मद्यधुंद अवस्थेत
ही घटना चिक्कमगलुरू रुग्णालयातील आहे. येथे रुग्णांवर सर्जरी होणार होती. यात सर्व महिला होत्या. प्राप्त माहितीनुसार, सकाळी ८ वाजता अॅनेस्थेशिया दिला गेला. दुपारी दोन वाजता सर्जरी केली जाणार होती. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी डॉक्टर बेहोश झाले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये मद्यधुंद अवस्थेत ते पडले होते.
डॉक्टरविरोधात कारवाई करण्याची मागणी
रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरची अशी सवय असल्याची बाब समोर आली. यापूर्वीही हा डॉक्टर नशेत सापडला आहे. यासंदर्भात चिक्कमगलुरू रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कोणताही बयाण समोर आला नाही. शिवाय आतापर्यंत डॉक्टरविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
परंतु, या डॉक्टरच्या विरोधात नातेवाईकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. अशा दारुड्या डॉक्टरविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे रुग्णांचे नातेवाईक म्हणाले. या सर्व रुग्ण्यांच्या नातेवाईकांचा तसेच रुग्णांचा चांगलाच मनस्ताप झाला.
डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो. पण, हेच डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी दारू पिऊन असतील, तर शस्त्रक्रिया कशा करतील. अशावेळी एखाद्या रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. असा डॉक्टरचा ऑपरेशनचा परवाना रद्द करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.