मंदिरात आलं कोट्यवधींचं दान, कर्मचारी पैसै मोजता मोजता थकले

मंदिरात आतापर्यंतच्या मोजणीनुसार विक्रमी ३४५.१६ कोटींचे दान दानपेटीत आले आहे. यापुर्वी २०२१ आणि २२ मध्ये कोरोनाचे निर्बंध होते. त्यामुळे भाविकांची गर्दी नव्हती. परंतु २०२० मध्ये १३० कोटींचे दान मंदिराला मिळाले होते.

मंदिरात आलं कोट्यवधींचं दान, कर्मचारी पैसै मोजता मोजता थकले
सबरीमाला मंदिर
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 3:14 PM

सबरीमाला : केरळमधील भगवान अयप्पांच्या सबरीमाला मंदिरात (Sabarimala Lord Ayyappa Temple) भक्तांची नेहमीच गर्दी असते. नोव्हेंबरपासून सुरु झालेला मंडलम मकरविलक्कू महोत्सवात लाखो भाविक आले. या भाविकांनी मनसोक्त दान दानपेटीत (donation sabarimala mandir) टाकाले आहे. मंदिरात भाविकांनी इतके दान दिले की मागील वर्षाचा विक्रम मोडला. यामुळे कर्मचारी पैसै मोजता मोजता थकले (employees tired) आहेत. मंदिराच्या दानपेटीत तब्बल ३५१ कोटी रुपयांचे दान आले आहे. दानात आलेल्या नाण्यांची मोजणी अजूनही सुरूच आहे. ६०० कर्मचारी ही मोजणी करतायं. या कर्मचाऱ्यांना नऊ तासांनंतर आराम द्यावा लागत आहे.

मंदिरात आतापर्यंतच्या मोजणीनुसार विक्रमी ३४५.१६ कोटींचे दान दानपेटीत आले आहे. यापुर्वी २०२१ आणि २२ मध्ये कोरोनाचे निर्बंध होते. त्यामुळे भाविकांची गर्दी नव्हती. परंतु २०२० मध्ये १३० कोटींचे दान मंदिराला मिळाले होते. आता कोविड निर्बंधांनंतर पहिल्यांदा झालेल्या महोत्सवात भरपूर देणगी मिळाली.

हे सुद्धा वाचा

नोटांची मोजणी यंत्राद्वारे

नोटांची मोजणी यंत्राद्वारे करण्यात येते. परंतु नाण्यांची मोजणी यंत्राद्वारे होत नाही. त्यासाठी ६०० कर्मचारी आहेत. ही मोजणी अजून सुरूच आहे. त्यासाठी एका मोठ्या स्टोअरमध्ये नाण्यांचे तीन डोंगर उभे गेले आहेत. मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नाणी हातानेच विभागावी लागत आहेत. कारण मशिनने ते मोजता येत नाही.

नाणी मोजण्यासाठी दोन विशेष अधिकाऱ्यांसह ११ सहायक आयुक्त देखरेखीसाठी तैनात करण्यात आले आहेत. सलग नऊ-नऊ तास नाणी मोजताना काही कर्मचारी एवढे थकलेत की त्यांना आराम करण्यासाठी पाठवावे लागले.

प्रसादाची विक्री जोरात

सबरीमाला मंदिराला प्रसादाच्या विक्रीतून मोठे उत्पन्न मिळत असते.  मंडलम मकरविलक्कू महोत्सवात अरावना आणि अप्पम प्रसाद म्हणून दिला जातो. अप्पम १०० रुपयांत मिळते. मंदिरात रोज एक लाख भाविक येतात. यामुळे मंदिरास प्रसादाच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळतंय.

शिर्डीतही  26 किलो सोने

शिर्डीत मोठ्या प्रमाणावर दान आले. शिर्डी मंदिर परिसरात असलेल्या ट्रस्टच्या कॅश काउंटरवरही मोठ्या संख्येने भाविकांनी रोख दान केले आहे. कॅश काउंटरवर दिलेल्या देणगीची एकूण रक्कम 74 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यापुर्वी 2022 मध्ये साईबाबा मंदिरात 26 किलोपेक्षा जास्त सोने मिळाले होते, ज्याची किंमत 12 कोटींहून अधिक होती. त्याच वेळी, 330 किलोपेक्षा जास्त चांदी मिळाली आहे, ज्याची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.