दूरदर्शनला अच्छे दिन, रामायण-महाभारत कार्यक्रमामुळे देशात दूरदर्शन पहिल्या स्थानावर

भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणारा चॅनेलच्या यादीत दूरदर्शन चॅनेलने पहिलं स्थान (Doordarshan number one in india) मिळवलं आहे.

दूरदर्शनला अच्छे दिन, रामायण-महाभारत कार्यक्रमामुळे देशात दूरदर्शन पहिल्या स्थानावर
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 5:09 PM

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणारा चॅनेलच्या यादीत दूरदर्शन चॅनेलने पहिलं स्थान (Doordarshan number one in india) मिळवलं आहे. रामायण आणि महाभारत या दोन प्रसिद्ध कार्यक्रमामुळे दूरदर्शनच्या व्ह्युअरशिपमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या चॅनेलने पहिलं स्थान मिळवलं आहे. या दोन्ही कार्यक्रमांनी सर्वाधिक प्रेक्षक वर्ग आपल्याकडे खेचून घेण्यात (Doordarshan number one in india) यश मिळवलं.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलकडून (BARC) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात रामायण आणि महाभारत कार्यक्रमामुळे संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेत दूरदर्शन चॅनेलच्या व्युअरशिपमध्ये 40 हजाराने वाढ झाली आहे.

लॉकडाऊनमुळे महाभारत आणि रामायण कार्यक्रमाचे प्रसारण करण्याचा निर्णय

देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे टेलिव्हिजन शो आणि चित्रपटाचे प्रोडक्शन बंद करण्यात आलं आहे. अशामध्ये सरकारकडून दूरदर्शनवर रामायण, महाभारत, शक्तिमान आणि बुनियादसारखे जुने प्रसिद्ध कार्यक्रम पुन्हा चॅनेलवर प्रसारित करण्यात आले आहे. दरम्यान, यामधील सर्वाधिक कार्यक्रम अशावेळी प्रसारित केले होते. ज्यावेळी देशात टीव्ही ब्रॉडकास्टिंगमध्ये दूरदर्शन एकमेव चॅनेल होता.

“एका आठवड्यात दूरदर्शनची व्ह्युअरशिप 650 टक्क्यांनी वाढली आहे. 12 व्या आठवड्यात चॅनेलची व्ह्युअरशिप 267 मिलियनेपेक्षा अधिक होती. तर 13 व्या आठवड्यात 2109 मिलियन पेक्षा अधिक झाली आहे”, असा दावा दूरदर्शनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. विशेष म्हणजे दूरदर्शनची सर्वाधिक व्ह्युअरशिपही ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून अधिक आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण कार्यक्रमाचे सर्वात पहिले प्रसारण 1987 मध्ये झाले होते. त्यावेळी लोकांमध्ये या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात क्रेझ होती. विशेष म्हणजे हा कार्यक्रम जेव्हा दूरदर्शनवर दाखवला जायचा त्यावेळेस रस्त्यांवर शुकशुकाट आणि ट्रेनही एक तास थांबवली जात होती. लोकं एकत्र मिळून हा कार्यक्रम बघत होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.