Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोक्याची घंटी वाजली… काय करावे आणि काय करू नये?, ही लक्षणे दिसल्यास समजा H3N2ची लागण झालीय; नीती आयोगाची गाइडलाईन काय?

देशभरात जानेवारीपासून विषाणूजन्य आजार वेगाने वाढत आहेत, ज्यामध्ये H3N2 ने चिंता वाढवली आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

धोक्याची घंटी वाजली... काय करावे आणि काय करू नये?, ही लक्षणे दिसल्यास समजा H3N2ची लागण झालीय; नीती आयोगाची गाइडलाईन काय?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 4:11 PM

नवी दिल्ली : H3N2 इन्फ्लूएंझाच्या हंगामी व्हायरसने देशात थैमान (virus spread in country) घातले आहे. शुक्रवारी, कर्नाटक आणि हरियाणामध्ये H3N2 मुळे प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून देशात विषाणूजन्य आजार वेगाने वाढत आहेत, ज्यामध्ये H3N2 ने चिंता वाढवली आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वं (guidelines) जारी केली आहेत. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य पाहता नीती आयोगानेही तातडीची बैठक घेत सर्व राज्यांना अलर्ट (states on alert) राहण्याचा इशारा दिला आहे.

या बैठकीत सर्व राज्यांना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये सज्जता, मनुष्यबळ, औषध, वैद्यकीय ऑक्सिजन आणि उपकरणे यांची उपलब्धता असेल हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. तसेच विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

मार्च अखेरीपर्यंत मिळू शकतो दिलासा

हे सुद्धा वाचा

देशातील कोविड-19 चा तीन वर्षांचा इतिहास पाहता, सरकारने श्वसनाच्या आजारांबाबत सावधानता बाळगली आहे. आजारी वृद्ध आणि लहान मुलांनी H3N2 इन्फ्लूएंझापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे की मार्चअखेर फ्लूचे रुग्ण कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी हंगामी इन्फ्लूएंझाचे दोन टप्पे असतात, पहिली जानेवारी ते मार्च आणि दुसरा टप्पा मान्सूननंतर सुरू होतो. याच कालावधीत भारतात विषाणूजन्य तापाच्या घटनांमध्ये वाढ दिसून येते. ओपीडीमधील तापाची प्रकरणे आणि दाखल रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे.

आरोग्य मंत्रालयाचे आहे लक्ष

सरकारतर्फे असे सांगण्यात आले आहे की हंगामी इन्फ्लूएंझाच्या उपप्रकार H3N2 च्या प्रकरणांवर सावधगिरीने लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य मंत्रालय H3N2 प्रकरणांचे रिअल टाइम मॉनिटरिंग करत आहे. राज्यांमध्ये हंगामी इन्फ्लूएंझाच्या H3N2 उपप्रकार प्रकरणांचे कठोर निरीक्षण आणि ट्रॅकिंग सुरू आहे. मार्चच्या अखेरीस हंगामी इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे.

H3N2 ची लक्षणे काय आहेत ?

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार H3N2 हा आजार इतर विषाणूंपेक्षा जास्त धोकादायक आहे. यामध्ये रुग्णाच्या रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता असते. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास खाली नमूद करण्यात आलेली लक्षणे दिसू शकतात.

– खोकला

– सर्दी

– 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप

– अशक्तपणा जाणवणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

– श्वासोच्छवासाचा वेग वाढणे

– छातीत दुखणे

– अंगदुखी

– शरीरातली पाण्याची पातळी कमी होणे

– अचानक चक्कर येणे

काय करावे अन् काय टाळावे ? काळजी कशी घ्यावी ?

– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

– गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

– हात स्वच्छ ठेवा. सॅनिटायझरचा वापर करा.

– डोळे, नाकाला, तोंडाला वारंवार स्पर्श करु नका

– खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा

– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

– भरपूर पाणी प्या

– ताजी फळे आणि फळांचा रस यांचे सेवन करा.

– पौष्टिक आहाराचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवा.

– नियमित व्यायाम करा.

तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.