दिल्लीला भूकंपाचे तीव्र झटके, जम्मू-काश्मीरमध्येही जमिनीला हादरे
अफगाणिस्तानमधील भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी मोजली गेली. 7 वाजून 55 मिनिटांनी येथे जमीन हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबादपासून 79 किमी दक्षिणेला होता.
दिल्ली : दिल्लीतील एनसीआरसह जम्मू-काश्मीरला भूकंपाचे तीव्र बसले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये जमिनीला हादरे बसले आहेत. दिल्लीत 7.57 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात भूकंपाचे केंद्र असून, भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंद करण्यात आली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नववर्षाच्या दिवशीही देशात भूकंपाचे धक्के जाणवले होते. 1 जानेवारी रोजी रात्री 11:28 वाजता मेघालयातील नोंगपोह येथे 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
Earthquake tremors felt in Delhi and adjacent areas. pic.twitter.com/vm0omiDObG
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) January 5, 2023
लोकांमध्ये भीतीचे वातावरण
दिल्लीतील एनसीआर हा परिसर भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. यामुळे जर येथे अधिक तीव्रतेचा भूकंप आला तर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे आज आलेल्या भूकंपानंतर येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अफगाणिस्तानमध्ये 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप
अफगाणिस्तानमधील भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी मोजली गेली. 7 वाजून 55 मिनिटांनी येथे जमीन हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबादपासून 79 किमी दक्षिणेला होता.
Earthquake of Magnitude:5.9, Occurred on 05-01-2023, 19:55:51 IST, Lat: 36.39 & Long: 70.66, Depth: 200 Km ,Location: 79km S of Fayzabad, Afghanistan for more information Download the BhooKamp App https://t.co/NNNsRSzym0@Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/Um0iJGWieT
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 5, 2023
भूकंप झाल्यास काय करावे?
– सर्व प्रथम भूकंप झाल्यास स्वतःला शांत करा आणि घाबरू नका.
– पटकन जवळच्या टेबलाखाली जा आणि आपले डोके झाकून टाका.
– जोपर्यंत हादरे थांबत नाहीत तोपर्यंत टेबलाखाली रहा.
– भूकंपाचे धक्के थांबताच ताबडतोब घर, कार्यालय किंवा खोलीतून बाहेर पडा.
– बाहेर पडताना लिफ्टचा वापर करू नका आणि बाहेर पडल्यानंतर झाडे, भिंती आणि खांबांपासून दूर राहा.
– भूकंपाच्या वेळी तुम्ही वाहनाच्या आत असाल तर वाहन ताबडतोब थांबवा आणि हादरे थांबेपर्यंत आतच रहा.