Breaking News : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

दिल्ली मनपा निवडणूक होण्यापूर्वीच जैन यांना अटक झाल्याने आपला धक्का आहे. जैन यांनी हवालामार्फत पैसा मागवला होता. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Breaking News : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई
मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री अटकेतImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 8:14 PM

नवी दिल्ली : मनी लॉंड्रिंग (Money Laundering) प्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते सत्येंद्र जैन (Satyandra Jain) यांना ईडीकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. जैन यांच्या अटकेमुळे दिल्ली सरकारला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली मनपा निवडणूक होण्यापूर्वीच जैन यांना अटक झाल्याने आपला धक्का आहे. जैन यांनी हवालामार्फत पैसा मागवला होता. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. आम आदमी पक्षाचे (आप) नेते सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचे हे ईडी प्रकरण ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्या आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.

एप्रिलमध्ये जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची 4.81 कोटी मालमत्ता जप्त

मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने एप्रिलमध्ये सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि पाणी मंत्री आहेत. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आप आमदाराची चौकशी केली होती. सुमारे 4.81 कोटी रुपयांची ही स्थावर मालमत्ता अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, पर्यस इन्फोसोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेजे आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, वैभव जैन यांच्या पत्नी स्वाती जैन, अजित प्रसाद जैन यांच्या पत्नी सुशीला जैन आणि सुनील जैन यांच्या पत्नी इंदू जैन यांच्याशी संबंधित आहेत, असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. (ED arrests Delhi Health Minister Satyendra Jain in money laundering case)

हे सुद्धा वाचा

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.