ICICI Bank Scam | चंदा कोचर यांना ईडीचं समन्स, कोर्टात आरोप निश्चित होणार
ईडी कोर्टाने चंदा कोचर यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. आज चंदा कोचर यांच्यावरील आरोप कोर्टात निश्चित होणार आहे
मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना ईडी कोर्टाने समन्स बजावलं आहे (ED Court Summoned ICICI Bank Former CEO Chanda Kochhar). ईडी कोर्टाने चंदा कोचर यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. आज चंदा कोचर यांच्यावरील आरोप कोर्टात निश्चित होणार आहे (ED Court Summoned ICICI Bank Former CEO Chanda Kochhar).
व्हिडिओकॉन कंपनीला नियम डावलून दिलेल्या लोनबाबत चंदा कोचर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर हे आरोपी आहेत. दीपक कोचर यांना अटक झाली असून ते सध्या जेल मध्ये आहेत.
या प्रकरणात आज आरोप निश्चित होणार आहेत. आरोप निश्चित होणे हा खटल्याचा एक महत्वाचा भाग आहे. यानंतरच खटला रीतसर सुरु होत असतो. यामुळे या प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी आज चंदा कोचर यांना कोर्टात हजर रहायचं आहे. यामुळे कोर्टाच्या या प्रक्रियेसाठी चंदा कोचर या आज कोर्टात हजर राहण्याची श्यक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे (ED Court Summoned ICICI Bank Former CEO Chanda Kochhar).
ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी आणि PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला.
ICICच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्टhttps://t.co/x0aXKd4nfL#moneylaundering #chandakochhar
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2021
ED Court Summoned ICICI Bank Former CEO Chanda Kochhar
संबंधित बातम्या :
ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा दणका