ED : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ईडीचे 2974 छापे, 2005 पासून आतापर्यंत केवळ 23 दोषी, आकडेवारी लोकसभेत सादर

2005 मध्ये पी एम एल ए कायदा अस्तित्वात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत 943 केसेस दाखल आहेत. तर 23 जण दोषी ठरले आहेत. मोदी सरकारच्या काळात ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत.

ED : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ईडीचे 2974 छापे, 2005 पासून आतापर्यंत केवळ 23 दोषी, आकडेवारी लोकसभेत सादर
ईडीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:17 PM

नवी दिल्ली: अमंलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं (ED) 2005 मध्ये प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (PMLA) अॅक्ट नुसार किती छापे टाकले, किती कारवाया करण्यात आल्या. आतापर्यंत कितीजण दोषी ठरले यासंदर्भातील माहिती दिली आहे. 2005 मध्ये कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर काँग्रेसचं सरकार 2014 पर्यंत केंद्रात सत्तेत होतं. 2014 ते 2022 पर्यंत नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आहे. लोकसभेत ईडीच्या छाप्यांबद्दलची आकडेवारी मांडण्यात आली. काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकारच्या काळात 112 छापे टाकण्यात आले आहेत. तर, ईडीनं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं सरकार आल्यानंतर 2974 छापे गेल्या आठ वर्षात टाकले आहेत. 2005 पासून ईडी कारवाया करत असली तरी केवळ 23 व्यक्तींना शिक्षा झाल्याचं समोर आलंय. याशिवाय राजकीय नेत्यांकडून ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं बोललं जातं. ही आकडेवारी समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया काय येणार हे पाहावं लागणार आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात किती छापे

केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार स्थापन झाल्यानंतर पीएमएलए कायदा अस्तित्त्वात आला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात 2004 ते 2014 या काळात ईडीनं 112 छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांअतर्गत 5316.16 कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भात 104 तक्रारी दाखल झाल्या होत्या, असं लोकसभेत मांडण्यात आलं.

भाजपच्या काळात किती छापे

2014 मध्ये केंद्र सरकारमध्ये भाजप सत्तेत आलं. 2014 ते 2022 या मोदी सरकाच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचं चित्र आकडेवारीतून दिसून आलं आहे. ईडीनं मोदींच्या कार्यकाळात 2974 छापे टाकले आहेत. तर, 839 तक्रारीअंतर्गत 95 हजार 432 कोटी रुपयांच्या गैरप्रकारांची चौकशी सुरु असल्याची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली आहे.

ईडीच्या कारवायांमध्ये किती दोषी ठरले?

ईडीनं 2005 पासून आतापर्यंत पीएमएलए कायद्यांतर्गत एकूण 3086 छापे टाकण्यात आले आहेत. त्यासंदर्भात 4964 ईसीआयर दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणापैकी 943 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ईडीच्या कारवायांमध्ये आतापर्यत 23 जण दोषी आढळले आहेत.

नरेंद्र मोदींच्या काळात ईडीचे छापे वाढले

2005 मध्ये पीएमएलए कायदा अस्तित्त्वात आला. 1999 च्या फेमा कायद्याअंतर्गत इडीनं केलेल्या कारवायांसदर्भातली आकडेवारी समोर आली आहे. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या सत्तेच्या काळात ईडीनं 112 छापे टाकले. तर, नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार आल्यानंतर 2974 छापे टाकण्यात आले आहेत. ही आकडेवारी पीएमएलए कायदा लागू झाल्यापासून म्हणजेच 1 जुलै 2005 पासूनची आहे.

इतर बातम्या:

Diesel Price | रिटेल स्थिर, होलसेल महाग; डिझेल खरेदीसाठी का लागल्या रांगा? जाणून घ्या एका क्लिकवर!

Special Report : शिवजयंतीवरुन अमेय खोपकर आणि अमोल मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.