सीमा हैदर प्रकरणात आता तिसऱ्याची एन्ट्री, कोण आहे एजाज?

सीमा हैदर प्रकरणात आता एजाज नामक तरुणाची एन्ट्री झाली आहे. सीमाने व्हिडिओ जारी करत एजाजसोबतच्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सीमा हैदर प्रकरणात आता तिसऱ्याची एन्ट्री, कोण आहे एजाज?
सीमा हैदर प्रकरणात एजाजची एन्ट्रीImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:42 AM

नवी दिल्ली : सीमा हैदर प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून नोएडात आल्यानंतर सीमाच्या पतीने एक व्हिडिओ जारी केला होता. ज्यात तो तिचा पती असल्याची माहिती त्याने दिली होती. यानंतर आता या लव ट्रायंगलमध्ये आणखी एका तरुणाची एन्ट्री झाली आहे. एजाज नामक तरुणासोबत सीमाचे नाव जोडण्यात आले आहे. तसेच सीमा त्याचे पैसे घेऊन पळाल्याचेही म्हटले आहे. एजाजचे नाव समोर आल्यानंतर सीमाने एक व्हिडिओ जारी करत याप्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सीमा 13 जुलै रोजी पाकिस्तानातून नोएडात सचिन प्रियकरासोबत राहण्यासाठी आली होती.

काय म्हणाली सीमा?

सीमाचे एजाजशी नाव जोडल्यानंतर तिने एक व्हिडिओ जारी करत आपल्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एजाज माझ्या घरमालकाचा भाचा आहे. त्यामुळे त्याचे येणे-जाणे असते. आमचे चांगले संबंध आहेत. त्याचे घरचेही मला कुटुंबाप्रमाणे मानतात. एकदा बाजारात खरेदी करायला गेलो असताना आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर घरी पण एक व्हिडिओ बनवला. याचा अर्थ त्याच्याशी माझे गैरसंबंध नाहीत. मला कळत नाही याबाबत चर्चा का होत आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर बोलण्याआधी सत्य जाणून घ्या.

कोण आहे एजाज?

एजाज सीमाचा रील्स पार्टनर होता. दोघांच्या अनेक रील्स समोर आल्या आहेत. दोघांच्या नात्याबद्दलही विविध चर्चा होत आहेत. सीमा एजाजचे पैसे घेऊन पळाल्याच्या चर्चा होत आहेत. तसेच सीमाला एजाजसोबत लग्न करायचे होते असेही म्हटले जात आहे. यानंतर व्हिडिओ जारी करत सीमाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.