AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Commission : निवडणूक आयोगाने निर्बंध केले शिथील; पूर्ण क्षमतेने रॅली, रोड शो घेण्यास मुभा

कोरोनाची घटती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कोरोनाचे निवडणूक कार्यक्रमांसंबंधी निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार यापुढे रॅली आणि जाहीर सभांमध्ये अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मैदानाच्या 50 टक्के क्षमतेने सार्वजनिक सभा घेण्याची परवानगी दिली जात होती.

Election Commission : निवडणूक आयोगाने निर्बंध केले शिथील; पूर्ण क्षमतेने रॅली, रोड शो घेण्यास मुभा
Election
| Updated on: Feb 22, 2022 | 9:55 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षणीय प्रमाणात घटला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच राज्य सरकारांना अतिरिक्त निर्बंध शिथील (Restrictions relaxed) करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचदरम्यान आता निवडणूक आयोगाने (Election Commission)ही कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट विचारात घेऊन निर्बंध शिथील केले आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाने पूर्ण क्षमतेने राजकीय रॅली आणि रोड शो घेण्यास परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर करीत देशातील सर्व राजकीय पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर कोरोना संसर्गात झालेली घसरण राजकीय पक्षांना फलदायी ठरण्याची शक्यता आहे. (Election Commission relaxes restrictions; Rallies, road shows at full capacity)

निवडणूक आयोगाने हे निर्बंध शिथील केले

कोरोनाची घटती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कोरोनाचे निवडणूक कार्यक्रमांसंबंधी निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार यापुढे रॅली आणि जाहीर सभांमध्ये अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मैदानाच्या 50 टक्के क्षमतेने सार्वजनिक सभा घेण्याची परवानगी दिली जात होती. आता 50 टक्के क्षमतेचे निर्बंध रद्द करीत पूर्ण क्षमतेने सार्वजनिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच आता मैदानात पूर्ण क्षमतेने रॅली आणि जाहीर सभा घेता येणार आहेत. याशिवाय रोड शो करण्यासही परवानगी मिळाली आहे.

निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा दिलासा

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान जानेवारीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. सध्या पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान झाले आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 172 जागांवर तीन टप्प्यात मतदान झाले आहे. बुधवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होत आहे. (Election Commission relaxes restrictions; Rallies, road shows at full capacity)

इतर बातम्या

मध्य प्रदेश पूर्ण निर्बंधमुक्त, कोरोना निर्बंधातून महाराष्ट्राची कधी सुटका?

प्रियांका गांधी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, भारतीय लोकशाहीचं मोठेपणं सांगणारं दृश्य, पाहा Video

राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.