पाच राज्यांमध्ये लवकरच निवडणुका, बुधवारच्या बैठकीत ठरणार तारीख, बंगालकडे विशेष लक्ष

पाच राज्यांत निवडणुकांची तारीख ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने बुधावरी (23 फेब्रुवारी) बैठक आयोजित केली आहे. (election commission state assembly election)

पाच राज्यांमध्ये लवकरच निवडणुका, बुधवारच्या बैठकीत ठरणार तारीख, बंगालकडे विशेष लक्ष
भारतीय निवडणूक आयोग
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:53 PM

नवी दिल्ली : आगामी काही महिन्यांमध्ये आसाम, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यातील विधानसभांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येथे लवकरच विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांची तारीख ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) बुधावरी (23 फेब्रुवारी) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निवडणुकांची तरीख तसेच, कोरोना संसर्ग, सुरक्षा, पोलीस संरक्षण या विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. (Election commission will held meeting on wednesday for date fixing of five state assembly election)

पश्चिम बंगालकडे विशेष लक्ष

देशात कोरोना माहारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मतदानावेळी गर्दी न होऊ देण्याला निवडणूक आयोगाचे प्राध्यान असेल. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस, सीआरपीएफ बंदोबस्त यावरसुद्धा चर्चा केली जाणार आहे. आगामी काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्येसुद्धा विधानसभेची निवडणूक होईल. पश्चिम बंगाल हे राज्य निवडणुकीच्या बाबतीत संवेदनशील राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे विशेष करुन या राज्यात निवडणूक कार्यक्रम राबवताना कोणती काळजी घ्यावी?, यावरसुद्धा उद्याच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानुसार पश्चिम बंगालमध्ये एकूण 6,400 मतदान केंद्रं संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक उपायुक्त सुदीप जैन गुरुवारी बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

एप्रील, मे मध्ये होऊ शकते निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे येथे एप्रील आणि मे या महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. देशात सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 ऐवजी 1000 मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे येथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता या पाच राज्यांमध्येसुद्धा मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.

इतर बातम्या :

ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

Gujarat Municipal Election Result : सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता

पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार? पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले…

(Election commission will held meeting on wednesday for date fixing of five state assembly election)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.