Chandrayaan 3 LIVE Telecast updates : चंद्रयान-3 आणि हॉलिवूड फिल्म इंटरस्टेलरच्या बजेटची तुलना, इलोन मस्क यांनी दिली अशी प्रतिक्रीया
चंद्रयान - 3 मिशन इस्रोचे महत्वाकांक्षी मिशन असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर भारत सॉफ्ट लॅंडींग करण्यात यशस्वी झाला तर भारत अमेरिका, रशिया आणि चीन नंतर जगातला चौथा देश ठरणार आहे.
नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : भारताचे महत्वांकाक्षी चंद्रयान-3 आता काही वेळातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडीगचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या या चंद्रयान-3 मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली तर भारत अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर सफल लॅंडींग करणारे चौथे राष्ट्र बनणार आहे. चंद्रयानचे बजेट केवळ 615 कोटी इतके आहे. तर प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट इंटरसेलरचे बजेट 1,368 कोटी रुपये होते.
माजी पत्रकार सिंडे पोम यांनी त्यांची संस्था न्यूजथिंकच्या ऑफीशियल ट्वीटर हॅण्डलवरुन एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटले की हे फार विचित्र आहे की भारताच्या चंद्रयान-3 बजेट ( 75 मिलियन डॉलर ) हे हॉलिवूड चित्रपट इंटरस्टेलर ( 165 मिलियन डॉलर ) पेक्षा किती तरी कमी आहे. त्यांनी ट्वीटमध्ये चंद्रयान-3 चा फोटो आणि इंटरस्टेलर चित्रपटाचे पोस्टर शेअर केला आहे.
अब्जाधीश इलोन मस्क यांनी या पोस्टवर एक दिवस उशीराने प्रतिक्रीया दिली आहे. इलोन मस्क यांनी प्रतिक्रीया दिली की गुड फॉर इंडीया ! टेस्लाच्या सीईओनी तेथे इंडीयाचा फ्लॅगचा इमोजीही शेअर केला आहे. इलोन मस्क यांच्या प्रतिक्रीयेला 60 हजाराहून अधिक लोकांनी पाहीले असून पाहणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. तसेच त्यास लाईक्स देखील केले जात आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
हेच ते तुलना करणारे ट्वीट –
Kinda crazy when you realize India’s budget for Chandrayaan-3 ($75M) is less than the film Interstellar ($165M)😯🚀 #Chandrayaan3 #moonlanding pic.twitter.com/r2ejJWbKwJ
— Newsthink (@Newsthink) August 21, 2023
युजरच्या प्रतिक्रीया काय ?
‘थॅंक्स फॉर एप्रिसिएशन मस्क ब्रो’ अशी प्रतिक्रीया एका युजरने दिली आहे. अखेर भारताचे सामर्थ्य जगाने ओळखले अशी प्रतिक्रीया अन्य एका युजरने दिली आहे. इलोन मस्क तुमच्या शद्बाबद्दल आभार आहे. आम्ही मार्सची रेसही जिंकू अशी प्रतिक्रीया एका युजरने दिली आहे.
तर भारताचा विक्रम
चंद्रयान – 3 मिशन इस्रोचे महत्वाकांक्षी मिशन असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर भारत सॉफ्ट लॅंडींग करण्यात यशस्वी झाला तर भारत अमेरिका, रशिया आणि चीन नंतर जगातला चौथा देश ठरणार आहे. तर दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार पहीला देश ठरणार आहे.