घरी जा आणि परत ऑफिसला येऊ नका, ट्विटरचा मेल; नवा बॉस येताच कर्मचाऱ्यांचं नशीब फिरलं

ट्विटरमध्ये सुधारणा घडवून आणायच्या आहेत. त्यामुळे ही नोकर कपात होत आहे. त्याचा ट्विटरला बहुमूल्य योगदान देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे.

घरी जा आणि परत ऑफिसला येऊ नका, ट्विटरचा मेल; नवा बॉस येताच कर्मचाऱ्यांचं नशीब फिरलं
घरी जा आणि परत ऑफिसला येऊ नका, ट्विटरचा मेल; नवा बॉस येताच कर्मचाऱ्यांचं नशीब फिरलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 11:50 AM

नवी दिल्ली: अब्जाधीश बॉस आल्यानंतर आपले दिवस पालटतील असं ट्विटरच्या (Twitter) कर्मचाऱ्यांना वाटलं होतं. पण एलन मस्क (Elon Musk) यांनी सूत्रे हाती घेताच नशीब पालटण्याऐवजी त्यांचं नशीबच फिरलं आहे. घरी जा आणि परत ऑफिसला येऊ नका. मेल आल्यावर समजून जा, असा मेलच ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवला आहे. ट्विटरने अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा (Private Jobs) निर्णय घेतला आहे. जवळपास 7500 कर्मचाऱ्यांना घरी बसवलं जाणार आहे. आजपासून ही मोहीम सुरू होणार असल्याने ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

एलन मस्क यांनी आधीच टॉपच्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. आता कनिष्ठ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. मस्क यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारा खर्च एक डॉलरपर्यंत कमी करण्याचा आदेश दिला आहे.

हे सुद्धा वाचा

न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरच्या मेलचा हवाला देऊन न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. ट्विटरचं अधिग्रहण केल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, नेड सहगल आणि सीन एडगेट यांना हटवल्याच्या एक आठवड्यानंतर मस्क शुक्रवारपासून ट्विटरमधील इतर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहेत, असं या वृत्तात म्हटलं आहे.

कर्मचारी कपात सुरू करण्यात येणार असल्याचं ट्विटरने कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. तुम्ही घरी जा आणि शुक्रवारी कामावर येऊ नका. कारण नोकर कपात सुरू झाली आहे, अशा सूचनाच ट्विटरने दिल्या होत्या.

ट्विटरमध्ये सुधारणा घडवून आणायच्या आहेत. त्यामुळे ही नोकर कपात होत आहे. त्याचा ट्विटरला बहुमूल्य योगदान देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. मात्र, कंपनीच्या यशासाठी दुर्देवाने हा निर्णय घ्यावा लागत आहे, असं मेलमध्ये म्हटलं आहे.

एकूण 3738 लोकांना कामावरून काढलं जाऊ शकतं. या यादीत बदल करण्यात येऊ शकतात, असंही मेलमध्ये स्पष्ट करण्यता आलं आहे. मात्र, नेमकं किती लोकांना कामावरून काढण्यात येणार याचा ठोस आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. ट्विटरकडून अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.