Fact check | कोरोना लसीमुळे खरंच नपुंसकत्व येतं?, जाणून घ्या नेमकं सत्य काय?

मुळे या लसी खरंच किती घातक आहेत?, या लसींमुळे माणसाला खरंच नपुंसकता येते का ?, या सर्व गोष्टींची आपण आज शहानिशा करुयात. (fact check corona vaccination)

Fact check | कोरोना लसीमुळे खरंच नपुंसकत्व येतं?, जाणून घ्या नेमकं सत्य काय?
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 2:48 PM

मुंबई : कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलेले असताना अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण सुरु झाले आहे. भारतामध्येसुद्धा एकूण तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परवानगी देताच या लीसींच्या साईड ईफेक्टबद्दल वेगवेगळ्या वावड्या उठत आहेत. कोरोनामुळे शरीरावार अनिष्ट परिणाम होतो की काय या विचाराने नागरिकांमध्ये लसीला घेऊन भीती निर्माण होत आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी लसीवर शंका उपस्थित करत लसीच्या माध्यमातून नागरिकांना नपुंसक बनवले जाऊ शकते असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर लसीच्या सुरक्षिततेविषयी जास्तच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या लसी खरंच किती घातक आहेत?, या लसींमुळे माणसाला खरंच नपुंसकता येते का ?, या सर्व गोष्टींची आपण आज शहानिशा करुयात. (fact check did people become Impotent after the corona vaccination)

लस आणि नपुंसकतेबद्दल आशुतोष सिन्हा काय म्हणाले?

समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिंन्हा यांनी लसीच्या सुरक्षेबद्दल थेट भाष्य करत परवानग्या दिलेल्या लसी असुरक्षित असल्याची शंका उपस्थित केली होती. “शरीराला घातक ठरणारे काही घटक लसीमध्ये असू शकतात. लोकसंख्या कमी करण्यासाठी, मारण्यासाठी आम्ही लस दिली असं हे लोक भविष्यात म्हणतील. ते तुम्हाला नपुंससुद्धा बनवू शकतील. काहीही होऊ शकतं,” असं सिन्हा म्हणाले होते.

खरंच लसीमुळे नपुंसकता येते?

सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. प्रजननाशी संबंधित असल्यामुळे यांच्या वक्तव्याची दखल सगळीकडे घेतली गेली. त्यामुळे लस घेतल्यानंतर खरंच नपुंसकता येते का हे समजून घेणे गरजेचे आहे. मूळात कोणतीही लस पूर्णपणे सुरक्षित नसते. लस घेतल्यानंतर शरीरावर थोड्या-फार प्रमाणात अप्लजीवी म्हणता येतील असे साईड ईफेक्ट निर्माण होतात. काहींना थोडी अ‌ॅलर्जी होते. तर काहींना डोकं दुखणं, ताप येणे अशी लक्षणं दिसू शकतात. मात्र, यामुळे लस असुरक्षित आहे असे समजणे पूर्णपणे चुकीचे आहे.

याबाबत अधिकची माहिती देताना डीसीजीआयचे संचालक व्ही. जी. सोमानी यांनी लसीबद्दलच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी मंजुरी देण्यात आलेल्या सर्व लसी पूर्णपणे सुरुक्षित असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, “आम्हाला थोडीजरी शंका असती तर आम्ही या लसींना परवानगी दिली नसती. या सर्व लसी 110 टक्के सुरक्षित आहेत. थोडा ताप, डोकेदुखी अशा प्रकारचे साईड ईफेक्ट प्रत्येक लसीच्या बाबतीत होतात. लसीमुळे लोकांना नपुंसकत्व येईल हा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन आहे,” असं सोमानी म्हणाले. तसेच त्यांनी इतरही अफवा फेटाळून लावल्या आहेत.

लसीमुळे हे साईड ईफेक्ट होऊ शकतात

ताप आणि थंडी हे लस घेतल्यानंर सर्वांना जाणवणारे सामान्य साईड ईफेक्ट आहेत. काही नागरिकांना डोकेदुखीचाही त्रास जाणवू शकतो. चक्कर येणे, पोट दुखणे, मळमळणे, थकवा अशा प्रकारची लक्षणंसुद्धा जाणवू शकतात. मात्र, या लक्षणांमुळे लसीला घाबरुन जाण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या :

Special Report | महाराष्ट्रात ड्राय रन पूर्ण, आता लवकरच लसीकरण !

लढ्याला यश! भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

(fact check did people become Impotent after the corona vaccination)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.