इथे ओशाळली माणुसकी… पोटच्या गोळ्याचा मृतदेह झोळीत टाकून जन्मदात्याचा 200 किलोमीटरचा प्रवास

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका 5 महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह एका बॅगेत ठेवून तो बसमधून 200 किलोमीटरपर्यंत नेल्याची घटना समोर आली आहे.

इथे ओशाळली माणुसकी... पोटच्या गोळ्याचा मृतदेह झोळीत टाकून जन्मदात्याचा 200 किलोमीटरचा प्रवास
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 9:40 AM

कलकत्ता : पश्चिम बंगालमधील (west bengal) सिलीगुडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांना आपल्या 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत (sons body in bag) घेऊन बसने 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. या घटनेनंतर राजकीय गोंधळही सुरू झाला आहे. भाजपने ममता बॅनर्जी सरकारच्या ‘स्वास्थ्य साथी’ योजनेवरीन प्रश्न विचारले त्यांना अडचणीत आणले आहे, तर तृणमूल काँग्रेसने हे स्वस्त राजकारण असल्याचे म्हटले आहे.

यामध्ये त्या मुलाचे वडील अशिम देबशर्मा यांनी रविवारी सांगितले की त्यांच्या 5 महिन्यांच्या मुलाचा शनिवारी रात्री सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या 6 दिवसांपासून या बालकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारासाठी 16 हजार रुपये खर्च झाले.

मृतदेह नेण्यासाठी अँब्युलन्सच नाही

रविवारी अशिमने रुग्णवाहिका चालकाला मुलाचा मृतदेह कालियागंज येथील त्याच्या घरी नेण्याची विनंती केली असता चालकाने त्याच्याकडे 8 हजार रुपयांची मागणी केली. आशिम यांनी दावा केला की 102 योजनेअंतर्गत चालणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाने त्यांना सांगितले की रुग्णांसाठी ही सुविधा मोफत आहे, परंतु मृतदेह वाहून नेण्याचा कोणताही नियम नाही.

प्रवाशांना थांगपत्ता लागू दिला नाही

अशिम देबशर्मा यांच्याकडे रुग्णवाहिका चालकाला देण्यासाठी 8,000 रुपये नव्हते, म्हणून त्यांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसमधून कालियागंजला नेण्याचा निर्णय घेतला. देबशर्मा यांनी मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी ते 200 किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंजपर्यंत बसने प्रवास केला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्याने त्याचा सुगावा लागू दिला नाही. इतर प्रवाशांना याबद्दल कळलं तर ते आपल्याला बसमधून खाली उतरवतील अशी भीती अशिमला यांना वाटत होती.

भाजपने टीएमसी सरकारला घेरले

ही घटना उघडकीस आल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारच्या ‘स्वास्थ्य साथी’ आरोग्य विमा योजनेवर टीका केली. त्यांनी मीडियाशी बोलत असलेल्या व्यक्तीच्या व्हिडिओसह या प्रकरणावर ट्विट केले आणि लिहिले, ‘या प्रकरणात तांत्रिक बाजू दूर ठेवली तरी, आरोग्य साथीने काय साध्य केले? दुर्दैवाने, हे ‘अगिये बांगला’ (प्रगत बंगाल) मॉडेलचे योग्य चित्रण आहे.

भाजप गलिच्छ राजकारण करत आहे: टीएमसी

या मुद्यावरून भाजपच्या हल्ल्याला तोंड देत टीएमसीने मुलाच्या मृत्यूमागे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. टीएमसीचे राज्यसभा खासदार शंतनू सेन म्हणाले की, ‘भाजप मुलाच्या दुर्दैवी मृत्यूवरून घाणेरडे राजकारण करत आहे.’

असाच एक प्रकार जलपाईगुडीमध्येही समोर आला होता

अशीच एक घटना या वर्षी जानेवारी महिन्यात बंगालच्या उत्तरेकडील जलपाईगुडी जिल्ह्यात घडली होती. येथील एका व्यक्तीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असता, रुग्णवाहिका चालकाने मृतदेह घरी नेण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैशाअभावी तो माणूस आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या घराकडे निघाला. मात्र, काही अंतर चालल्यानंतर एका समाजसेवी संस्थेने त्यांना मोफत वाहन उपलब्ध करून दिले.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....