Milk Price : वाढलेल्या दुधाच्या दरात ‘मिठाचा खडा’, केंद्राचे धोरण की दूध पावडरच्या किंमतीचा परिणाम!

दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हा जोड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होता. मुख्य हंगामाला दूग्ध व्यवसयाची जोड दिल्यास उत्पादन वाढणार यामध्ये शंकाच नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतनााच दरात घट झाली आहे. दुधाचे दर आता 35 रुपये लिटरहून थेट 32 रुपयांवर येण्याचा अंदाज आहे.

Milk Price : वाढलेल्या दुधाच्या दरात 'मिठाचा खडा', केंद्राचे धोरण की दूध पावडरच्या किंमतीचा परिणाम!
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:53 AM

बारामती : गेल्या दोन महिन्यांमध्ये सलग तीन वेळा गाई आणि म्हशीच्या (Milk Price) दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परस्थितीमध्ये (Farmer) शेतकऱ्यांसाठी हे अच्छे दिन मानले जात होते. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरात पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरवात झाली आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांनी घसरण झाली असून त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. (Rates of animal feed) पशूखाद्याचे दर महिन्याकाठी वाढत असताना दूधाचे वाढलेले दर महिनाभर देखील टिकून राहिलेले नाहीत. दर घटण्यामागे दूध पावडरच्या दरात झालेली घट किंवा दूध पदार्थाच्या निर्यातीबाबत केंद्राची धरसोड वृत्ती हीच कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसलेला आहे. आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणेकडून आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

महिन्यातच दोन रुपायांनी घट

दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हा जोड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होता. मुख्य हंगामाला दूग्ध व्यवसयाची जोड दिल्यास उत्पादन वाढणार यामध्ये शंकाच नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतनााच दरात घट झाली आहे. दुधाचे दर आता 35 रुपये लिटरहून थेट 32 रुपयांवर येण्याचा अंदाज आहे. तब्बल वर्षभरानंतर दुधाच्या दरात वाढ झाली होती. मात्र, वाढलेले दर महिनाभरही टिकून राहिले गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून मध्यंतरीच्या दरवाढीच्या कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.

केंद्राचे धोरण की आणखीन काय?

केंद्राच्या धोरणाचा सर्वाधिक परिणाम हा शेतीमालाच्या दरावर होत असतो. हे कमी म्हणून की काय आता शेतीच्या जोड व्यवसयावर देखील परिणाम होऊ लागला आहे. दोन महिन्यापूर्वीच दूध दरात ते देखील वर्षभराने 2 रुपयांची वाढ झाली होती. सलग दोन वेळा वाढ झाल्याने अडचणत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होता पण अवघ्या दोन महिन्यातच दर पुर्वपदावर आले आहेत. केंद्र सरकारच्या दूध पदार्थांच्या निर्यातीबाबत धरसोड धोरणामुळे ही दर घरसण झाली की दूध पावडरच्या दर कमी झाल्याने हा निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली का हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

आता संबंधित यंत्रणेची भूमिका महत्वाची

दुधाचे दर अस्थिर झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय दुसरीकडे उत्पादनात घट आणि नैसर्गिक संकटाची मालिका ही सुरुच आहे. वाढलेल्या दरामुळे पुन्हा दुग्ध व्यवसाय वाढवण्याचा निर्धार शेतकरी व्यक्त करीत असताना पुन्हा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दुधाचे दर स्थिर राहण्याच्या अनुशंगाने यंत्रणेकडून आवश्यक ते प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकीकडे दुधाला 50 रुपये लिटर अशी मागणी होत असताना दूध दरात झालेली घसरण चिंतेचा विषय आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.