परिवारवादाने पवार आणि ठाकरे यांचा पक्ष तोडला, पीयूष गोयल यांचा घणाघात

महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना टीव्ही 9 भारतवर्षने सत्ता संमेलन कार्यक्रमात दिग्गज राजकीय नेत्यांना बोलते केले आहे. या कार्यक्रमात भाजपा नेते, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महायुती डबल इंजिन सरकार ताकदीने महाराष्ट्रात येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

परिवारवादाने पवार आणि ठाकरे यांचा पक्ष तोडला, पीयूष गोयल यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 10:38 PM

राजकीय पक्ष कोणा एका कुटुंबाच्या मालकीचे नसतात तर त्यांची एक घटना असते. पक्षांवर कार्यकर्त्यांच्या अधिकार सर्वाधिक असतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी परिवार म्हणजेच पक्ष असा विचार केल्याने त्यांच्या परिवारवादानेच त्यांचा पक्ष तोडला गेला असा घणाघात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज येथे केला. टीव्ही 9 भारतवर्ष सत्ता संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.

पीयूष गोयल पुढे म्हणाले की खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्याकडे आली आहे. कारण महायुतीत राहाण्याचा निर्णय शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या 40-40 आमदारांनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेना खरी तर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी तोडली असल्याचे त्यांनी सांगितले. मधल्या काळात अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकारच्या योजना थांबवल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबला होता. परंतू आता पुन्हा महायुतीच्या सरकारने अर्थव्यवस्था रुळांवर आणली आहे. देशात तिसऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे. हरयाणात भाजपाचा मोठा विजय झाला आहे. लोकसभेत आम्ही 11 सिट फार कमी मार्जिनने हरलो आहोत. परंतू आता महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार असल्याचे पीयुष गोयल यांनी सांगितले. भारताचे लोक तृष्टीकरणाच्या आणि नकारात्मक राजकारणाला कंटाळलेले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विकास करायचा असल्याचेही पीयूष गोयल यांनी सांगितले.

फडणवीस यांनी स्मुथ टेक ऑफ घेतलेय

गेले दीड महिन्यांपासून मी महाराष्ट्रात फिरत आहे. आणि महायुतीने लाडकी बहीण सारखे घेतलेल्या निर्णयाने त्यामुळे महिलांचे सशक्तीकरण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल अशा विश्वास भाजपाच्या नेत्या माजी खासदार पूनम महाजन यांनी यावेळी सांगितले. एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन जे वाद सुरु आहेत. ते पाहता महायुती मजबूत स्थितीतू असून देवेंद्र फडणवीस यांनी स्मुथ टेक ऑफ घेतल्याचे पूनम महाजन यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.