शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अश्लील मेसेज, जीवे मारण्याचे धमकीचे फोन
राकेश टिकैत यांना वेगवेगळ्या फोन नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत (farmer leader Rakesh Tikait got ransom message via unknown numbers)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मध्यंतरी या आंदोलनाला हिंस्त्रक वळणही लागलं होतं. त्यानंतर केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. मात्र, त्यातून काहीच निषपण्ण झालं नाही. अखेर अजूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनातील महत्त्वाचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांना व्हाट्स अॅपवर अश्लील मेसेज येत असल्याची माहिती समोर आलीय (farmer leader Rakesh Tikait got ransom message via unknown numbers).
नेमकं प्रकरण काय?
राकेश टिकैत यांना वेगवेगळ्या फोन नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. तसेच त्यांना अश्लील मेसेजही येत आहेत. या मेसेजमध्ये त्यांच्याकडून 11 हजार रुपयांची मागणी देखील केली जात आहे. याप्रकरणी टिकैत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश पोलीसही तपासाला लागले आहेत (farmer leader Rakesh Tikait got ransom message via unknown numbers).
टिकैत यांना याआधीही धमकीचे फोन
राकेश टिकैत यांना याआधीही धमकीचे फोन आले आहेत. त्यांना सर्वात आधी बिहारमधून फोन आला होता. जेव्हा टिकैत यांनी फोन उचलला तेव्हा समोरच्या व्यक्तीने हत्यारांची गरज आहे का? किती हत्यारं पाठवायची आहेत ते सांगा? तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे, अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली होती.
गाझियाबादच्या पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल
राकेश टिकैत यांना धमकीचे फोन आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. भारतीय किसान युनियन संघटनेचे जिल्हास्तरी पदाधिकारी जयकुमार यांनी गाझियाबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित फोन नंबरची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या, गोळी चालवल्याचाही आरोप!