FARMER PROTEST | शेतकरी आंदोलक आणि सरकारमधील आजची बैठक रद्द

आज शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये कुठलीही बैठक होणार नाही. सरकार शेतकऱ्यांना एक प्रस्ताव देणार आहे. या प्रस्तावावर शेतकरी नेते आपसांत चर्चा करतील. पण केंद्र सरकार कृषी कायदे परत घेण्यास तयार नसल्याचं हनन मुल्ला यांनी सांगितलं आहे.

FARMER PROTEST | शेतकरी आंदोलक आणि सरकारमधील आजची बैठक रद्द
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 8:48 AM

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आज 14 दिवस आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रसिदात देत काल देशभरात भारत बंद करण्यात आला. या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज शेतकरी आणि सरकारमध्ये एक महत्वाची बैठक होणार होती. पण ही बैठक रद्द करण्यात आली आहे. आज सरकारकडून शेतकऱ्यांना एक प्रस्ताव दिला जाणार आहे. या प्रस्तावावर शेतकरी दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहेत.(Today’s meeting between farmers and government canceled)

ऑल इंडिया किसान सभाचे सचिव हनन मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये कुठलीही बैठक होणार नाही. सरकार शेतकऱ्यांना एक प्रस्ताव देणार आहे. या प्रस्तावावर शेतकरी नेते आपसांत चर्चा करतील. पण केंद्र सरकार कृषी कायदे परत घेण्यास तयार नसल्याचंही मुल्ला यांनी सांगितलं आहे.

अमित शाहांच्या बैठकीतही तोडगा नाही

सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आज सिंधू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांची दुपारी 12 वाजता एक बैठक होणार आहे. दरम्यान काल झालेल्या भारत बंदनंतर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विविध संघटनांचे 13 शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. या शेतकरी नेत्यांमध्ये 8 नेते हे पंजाबमधील होते तर देशभरातून विविध संघटनांचे आलेल्या 5 नेत्यांचा त्यात समावेश होता. अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाशही उपस्थित होते.

शेतकरी आंदोलनाचा 14वा दिवस

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 14 दिवस आहे. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये एकूण 5 बैठका पार पडल्या आहे. मात्र त्यातून काही तोडगा निघालेला नाही. दरम्यान काल शेतकरी नेत्यांनी केलेल्या आवाहनानुसार भारत बंद पुकारण्यात आला. या बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. व्यापारी प्रतिष्ठान, APMC मार्केट बंद ठेवण्यात आले होते. रस्ते वाहतुकीवरही या बंदचा काहीसा परिणाम पाहायला मिळाला. काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडल्याचं पाहायला मिळालं.

आज विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार

नवे कृषी कायदे आणि त्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं आंदोलन, या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांचे 5 प्रमुख नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ही भेट आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, डी. राजा यांच्यासह अजून एका नेत्याचा समावेश असणार आहे.

संबंधित बातम्या:

Sunil Prabhu | शिवसेनेचा पाठिंबा शेतकऱ्यांना आधार आणि अधिकार मिळवून देण्यासाठी : सुनील प्रभू

Bharat Bandh मध्ये जेवढं नुकसान झालं तेवढ्या पैशात दिल्लीत सगळ्या नागरिकांचं दोनदा लसीकरण झालं असतं

FARMER PROTEST | राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार

Today’s meeting between farmers and government canceled

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.