मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे.

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 5:38 PM

चंदीगड : मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलन करत रेल्वे रोको केल्याने पंजाबमधील जवळपास 41 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 11 रेल्वे गाड्यांच्या दैनंदिन फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या रेल्वेपैकी बऱ्याच रेल्वे नवी दिल्ली-कटरा मार्गावरील आहेत. या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याआधी देखील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 28 रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या (Farmers agitation in Punjab against Modi Government Farm Laws 41 trains railway cancelled).

पंजाबमध्ये मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. मागील महिन्यातच पंजाब सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव संमत करत नवे 3 कृषी विधेयकं मंजूर करण्यात आले. यानंतर हे तिन्ही विधेयकं राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबरला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी 24 सप्टेंबरपासून पंजाबमधील रेल्वे मालगाडी सेवा बंद केल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनही केलं.

पंजाब असं पहिलं राज्य आहे ज्याने मोदी सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात थेट विधानसभेत प्रस्ताव संमत केला आणि विधेयकही मंजूर केलं. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले, “केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होणार आहे. याशिवाय या कायद्यांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीसोबतच शेती क्षेत्र उद्ध्वस्त होईल.”

पंजाबमध्ये काँग्रेसशिवाय इतर अनेक पक्ष आणि संघटना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. याच कायद्यांवरुन एनडीएचा अत्यंत जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दलने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पंजाबनंतर हरियाणातही कृषी कायद्यांना मोठा विरोध होतोय.

संबंधित बातम्या :

कृषी कायद्यातील सुधारणांचा विचार आवश्यक, शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका

“तुमच्या निर्णयांमुळे शेतकऱ्याच्या गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेतेय”, शिवसेना आमदाराच्या मुलीचं मोदींना खुलं पत्र

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

संबंधित व्हिडीओ :

Farmers agitation in Punjab against Modi Government Farm Laws 41 trains railway cancelled

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.