Delhi Farmers Tractor Rally LIVE | दिल्लीतल्या आंदोलनाला हिंसक वळण, ही दुर्घटना देशासाठी कलंक : अण्णा हजारे

| Updated on: Jan 27, 2021 | 10:50 AM

Delhi Farmers Tractor Rally LIVE : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं.

Delhi Farmers Tractor Rally LIVE | दिल्लीतल्या आंदोलनाला हिंसक वळण, ही दुर्घटना देशासाठी कलंक : अण्णा हजारे

Kisan tractor rally live updates : राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers tractor rally) हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर कूच केली. यादरम्यान झटापट झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज तर शेतकऱ्यांनी दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर जाऊन झेंडा फडकवला. या धुमश्चक्रीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. शिवाय अनेक शेतकऱ्यांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jan 2021 09:50 PM (IST)

    दिल्लीतल्या आंदोलनाला हिंसक वळण, ही दुर्घटना देशासाठी कलंक : अण्णा हजारे

    जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज दिल्लीतल्या आंदोलनाबाबत त्यांचं मत मांडलं आहे. अण्णा म्हणाले की, दिल्लीमधल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं ही आपल्या देशाच्या दृष्टीने दुर्घटना असून हा एक कलंक आहे. कारण आज देशाचा प्रजासत्ताक दिन आहे, आजच्या दिवशी या देशात प्रजेची सत्ता आली आणि देशातील प्रजा मालक झाली, राष्ट्रीय संपत्ती देशाची झाली. अशा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतले, समाजाला त्रास झाला राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, ही दुर्दैवी घटना आहे.

  • 26 Jan 2021 09:12 PM (IST)

    दिल्ली पोलीस दलाचे 83 जवान जखमी

    दिल्ली पोलिस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसेदरम्यान आतापर्यंत 83 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.

  • 26 Jan 2021 07:41 PM (IST)

    Kisan Republic Day Parade : ट्रॅक्टर आंदोलन संपलं, मात्र शांततेत आंदोलन सुरुच राहणार

    संयुक्त किसान मोर्चाकडून किसान प्रजासत्ताक परेडची सांगता, सर्व आंदोलकांना आपआपल्या आंदोलनस्थळी परतण्याचे निर्देश, कृषी कायद्याविरोधात शांततेत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार, आंदोलनाची पुढील दिशा चर्चेनंतर ठरवणार

  • 26 Jan 2021 06:22 PM (IST)

    Delhi Farmers Tractor Rally red fort LIVE आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या शक्तींचा शोध घ्या : अशोक चव्हाण

    दिल्लीमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या शक्तींचा शोध घ्यावा अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केलीय. हिंसाचाराचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही,मात्र शेतकऱ्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर ही स्थिती उद्भवली नसती असेही चव्हाण म्हणाले आहेत

  • 26 Jan 2021 05:50 PM (IST)

    केंद्रानं शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका सोडावी, पंजाबला परत अस्वस्थतेकडे नेऊ नये: शरद पवार

    कृषी कायद्यांची चर्चा 2003 पासून सुरु आहे. सगळ्या राज्यांच्या कृषी आणि पणनमंत्र्यांशी चर्चा करुन कायदे करण्याबाबत चर्चा झाली. निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार आलं. नरेंद्र मोदी सरकारनं 3 कायदे संसदेत आणले.

    विरोधकांचं मत कायद्यांवर सविस्तर चर्चा व्हावी. सिलेक्ट कमिटीकडे विधेयकं पाठवावी. तिथं सरकारचं बहुमत असतं. सिलेक्ट कमिटीमध्ये पक्षीय भूमिकेपलीकडे जाऊन निर्णय होतो. सिलेक्ट कमिटीकडून आल्यावर विरोध होत नाही.

    सरकारनं एका दिवसात विधेयक आणली. गोंधळात विधेयक मंजूर केली गेली. त्यामुळे विरोध सुरु झाला. यामुळे शेतकरी विरोध करतील असं वाटत होते. गेल्या 50 ते 60 दिवस पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी संयमानं आंदोलन केले. दिल्लीच्या सीमांवर 5 किलोमीटर वर शेतकरी संयमानं बसतात, ही अभूतपूर्व गोष्ट आहे. शेतकरी संयमानं बसले होते त्यावेळी सरकारनं अधिक सक्रिय होऊन मार्ग काढला पाहिजे होता.

    शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारनं आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्यांनी समंजस पणानं बघण्याची गरज होती. पंजाब आणि देशातील अन्नदाता, असा शेतकरी वर्ग न दुखवता मार्ग काढण्याची जबाबदारी असातना त्या आंदोलनाच्या बाबतीत, शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी जाचक अटी टाकण्यात आल्या. दिल्लीत जे घडलं त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. पण ते का घडलं?याचा विचार करण्याची गरज आहे.

    अजूनही केंद्र सरकारनं शहाणपणा दाखवावा, या घटकांशी बोलत असताना टोकाची भूमिका सोडावी, शेतकऱ्यांशी संवाद साधावा. बळाचा वापर करुन काही करु शकतो अशी सरकारची भूमिका असेल तर पंजाबला अस्वस्थेकडे नेण्याचं पाप मोदी सरकारनं करु नये, असं शरद पवार म्हणाले.

  • 26 Jan 2021 05:01 PM (IST)

    Delhi Farmers Tractor Rally Red fort : गेट बंद, लाल किल्ल्याला पोलिसांचा वेढा

    लाल किल्ल्याचे गेट बंद, अतिरिक्त कुमक पाठवणार, पोलिसांनी आंदोलकांना पांगवलं, लाल किल्ल्याला पोलिसांचा वेढा, पोलिसांनी ठिकठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर गृहमंत्री अमित शाहांच्या घरी सरकारची तातडीची बैठक

  • 26 Jan 2021 04:56 PM (IST)

    …अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

    माजी खासदार राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर टीका, दिल्लीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज करून केंद्र सरकारने आपली जागा दाखवली आहे. केंद्र सरकारने चर्चा न करता यावर तोडगा काढावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलने होतील : माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

  • 26 Jan 2021 04:36 PM (IST)

    Delhi Farmers Tractor Rally | राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत

    राष्ट्रीय शर्मेची ही बाब आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला. दोन महिन्यापासून शांततेने आंदोलन सुरु होतं. जगभरात त्याचं कौतुक होतं. शेतकऱ्यांचं इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कुठे झालं नाही. आज अचानक काय झालं? शेतकर्यांचा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का? शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटणार होता, तर ती सरकारचीही जबाबदारी होती. आजची ट्रॅक्टर रॅली रोखून शेतकऱ्यांना नीट घरी जाऊ दिलं असतं.

    प्रश्न तीन कृषी कायद्यांचा आहे. माणसांसाठी कायदे आहेत, कायद्यांसाठी माणसं नाहीत.

    शेतकऱ्यांचा संयम तुटत असताना सरकारची काही जबाबदारी नव्हती का कायदा नेमका कुणासाठी? शेतकऱ्यांचं ऐकलं जात नसेल तर तो कायदा कुणासाठी झालाय दिल्लीच्या रस्त्यावर आज जी अराजकता निर्माण झाली आहे पंजाब अशांत व्हावा, पंजाबच्या लोकांना खलिस्तानी ठरवून अराजकता निर्माण करावी हे षडयंत्र आहे का आज हे घडायला नको होतं. सरकारने या गोष्टीची जबाबदारी घ्यायला हवी या ठिकाणी दुसरा पक्ष असता किंवा इतर कोणत्या राज्यात हा प्रकार घडला असता तर राजीनामा मागितला गेला असता आज जी घटना घडली त्याबद्दल कुणाचा राजीनामा मागणार सोनिया गांधी , ममता, उद्धव , पवारांचा राजीनामा मागणार का की जो बायडनचा राजीनामा घेणार कोण घेणार याची जबाबदारी सरकारच्या अहंकारामुळे हे घडत आहे सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी हे आमचं आवाहन आहे काल मुंबईत हजारो शेतकरी आले, पण आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली

    अमित शहांचा राजीनामा मागितला नाही दिल्लीत इतर कुणाचं सरकार असतं राजीनामा मागितला गेला असता सोनिया गांधीचा राजीनामा मागितला असता महाराष्ट्रात घडलं असतं तर उद्वव ठाकरेंचा राजीनामा मागितला असता

    जाणूनबुजून आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली जात आहे गेल्या वर्षी शाहीनबागच्या निमित्ताने ही परिस्थिती निर्माण केली होती वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं हा लोकशाहीला धोका

  • 26 Jan 2021 04:25 PM (IST)

    61 दिवस शेतकऱ्यांची मानसिकता काय झाली असेल? बाळासाहेब थोरातांचा सवाल

    ६१ दिवस झाले शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अभूतपूर्व आंदोलन करतायत, हे शेतकरी पंजाब, हरयाणाचे आहेत. तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी करतायत. देश भुकेला असताना ज्या शेतकर्‍यांनी देशाला अन्न पुरवलं ते शेतकरी हे आहेत. थंडी, वा-यात दोन महिने आंदोलन करतोय. पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही. हा प्रजासत्ताक आहे का? जनतेची साधी विचारपूस केली जात नाही. चर्चेने थकून जावं, त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न. तो आज वेगळ्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाऊ नये हा गांधींचा देश आहे. खलिस्तानी म्हणणं, गुंड म्हणणं या पातळीवर भाजप गेलेले आहेत. ६१ दिवसात त्यांची मानसिकता काय झाली असेल ते बघायला हवं. – शांततेत आंदोलन सुरू असताना अडचणी निर्माण केल्या गेल्या. केंद्र सरकार जबाबदार हिंसक वळण लागलं त्याला – बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

  • 26 Jan 2021 04:15 PM (IST)

    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटलं; केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक सुरू

    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटलं; केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक सुरू, शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारच्या तातडीच्या हालचाली

  • 26 Jan 2021 04:11 PM (IST)

    Delhi Farmers Tractor Rally दिल्लीत काय काय बंद?

    दिल्लीत काय काय बंद?

    इंटरनेट मेट्रो इंडिया गेटकडे जाणारे सर्व मार्ग जामा मशीद मेट्रो राष्ट्रपती भवनाबाहेर कडेकोट सुरक्षा पंतप्रधानांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

  • 26 Jan 2021 04:04 PM (IST)

    सरकारच्या आडमुठेपणामुळे शेतकरी आंदोलनात तोडगा नाही : जयंत पाटील

    नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वागणूक दिली, हे भारतातील शेतकऱ्यांना कायमची लक्षात राहील. या देशातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी केंद्र सरकार चा निषेध व्यक्त करतो. लोकशाहीत लवचिकता ठेवावी लागते मात्र कोणतीही लवचिकता न ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आता अधिक त्वेषाने उठेल आणि आपल्या मागण्या मान्य करून घेईल. दिल्लीत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत असताना सरकारचा आडमुठेपणा आणि मर्यादित चर्चा केली म्हणून शेतकरी आंदोलनात तोडगा निघाला नाही – जलसंपदा मंत्री जयंत पाटील.

  • 26 Jan 2021 03:46 PM (IST)

    राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय

    दिल्लीत आंदोलक शेतकरी आक्रमक झाल्यामुळे राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 26 Jan 2021 03:43 PM (IST)

    Delhi Farmers Tractor Rally : भाजपला हे महागात पडेल, गुलाबराव पाटील कडाडले

    दिल्लीत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे. परंतु केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.भाजपला हे महागात पडेल अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

  • 26 Jan 2021 03:39 PM (IST)

    दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट सेवा बंद, आंदोलन चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानीमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

  • 26 Jan 2021 03:13 PM (IST)

    तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, सरकारने ठरवलं असतं तर हिंसा टाळली असती : संजय राऊत

    शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

  • 26 Jan 2021 02:59 PM (IST)

    Delhi Farmers Tractor Rally : पुन्हा एकदा शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे कूच

    Delhi Farmers Tractor Rally : पुन्हा एकदा शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे कूच, लाल किल्ल्यावर चढून झेंडा फडकवला, पोलिसांकडून बळाचा वापर करुन, परिसर रिकामा करण्याचा प्रयत्न

  • 26 Jan 2021 02:37 PM (IST)

    लाल किल्ल्यावर आंदोलक पोहोचले; सरकारशी चर्चा करणारे शेतकरी नेते कुठे?

    दिल्लीतील  लाल किल्ल्यावर आंदोलक पोहोचले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून सरकारशी चर्चा करणारे 40 नेते कुठे आहेत?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 26 Jan 2021 02:29 PM (IST)

    आंदोलकांवर फक्त पाण्याचा मार, अश्रूधूराचे गोळे, बॅरिकेडसचा वापर

    पोलीस आणि सीआरपीएफकडून बळाचा वापर केला जाणार नसल्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्यांच कळतय. आंदोलकांवर फक्त पाण्याचा मार, अश्रूधूराचे गोळे, बॅरिकेडस चा वापर करण्याच्या सूचना असल्याची माहिती आहे.

  • 26 Jan 2021 02:26 PM (IST)

    गाजीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी कंटेनर्स हटवले

    गाजीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी कंटेनर्स हटवले

  • 26 Jan 2021 02:24 PM (IST)

    Farmers Tractor Rally LIVE | लाल किल्यावर धडक, पोलिसांवर हल्ला; दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण

    Farmers Tractor Rally LIVE | लाल किल्यावर धडक, पोलिसांवर हल्ला; दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण

  • 26 Jan 2021 02:24 PM (IST)

    Farmer Protest | दिल्लीत शेतकरी आंदोलन चिघळलं, शेतकऱ्यांच्या दगडफेकीत पोलीस जखमी

    Farmer Protest | दिल्लीत शेतकरी आंदोलन चिघळलं, शेतकऱ्यांच्या दगडफेकीत पोलीस जखमी

  • 26 Jan 2021 02:22 PM (IST)

    दिल्लीच्या सीमांवर सीआरपीएफच्या 65 तुकड्या तैनात

    दिल्लीतील सीमांवर सीआरपीएफच्या 65 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गरज वाढल्यास आणखी तुकड्या वाढवल्या जाणार आहेत.

  • 26 Jan 2021 02:20 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वेषापोटी हे सर्व चाललंय: सुधीर मुनगंटीवार

    शेतकरी असं कृत्य कधीही करणार नाही. शेतकऱ्यांच्या हातून असं घडणार नाही. भ्रमित करुन त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकरी हिताचा विचार काँग्रेसच्या मनात कधीच नव्हता. देशात आणि राज्यात काँग्रेसच सरकार होते मात्र मोदींच्या द्वेषापोटी शेतकऱ्यांच्या आडून हे सर्व चाललंय: सुधीर मुनगंटीवार

  • 26 Jan 2021 02:14 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय दिला पाहिजे, हे माझ मतं :अजित पवार

    शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय दिला पाहिजे, हे माझ मतं :अजित पवार

  • 26 Jan 2021 02:13 PM (IST)

    हिंसेने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, जखमी कोणीही झालं तरी देशाचं नुकसान, देशाच्या हितासाठी कायदा परत घ्या: राहुल गांधी

    हिंसेने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, जखमी कोणीही झालं तरी देशाचं नुकसान: राहुल गांधी

  • 26 Jan 2021 02:08 PM (IST)

    लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांचा ध्वज फडकावण्याचा प्रयत्न

    लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांचा ध्वज फडकावण्याचा प्रयत्न

  • 26 Jan 2021 02:06 PM (IST)

    शेतकऱ्यांचा लाल किल्ल्यावर झेंडा फडकावण्याचा प्रयत्न, आंदोलकांची धग लाल किल्ल्यापर्यंत पोहोचली

    शेतकऱ्यांचा लाल किल्ल्यावर झेंडा फडकावण्याचा प्रयत्न

  • 26 Jan 2021 02:04 PM (IST)

    दिल्लीत शेतकरी मोर्चाला हिंसक वळण, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

    दिल्लीत शेतकरी मोर्चाला हिंसक वळण, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

  • 26 Jan 2021 02:03 PM (IST)

    शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले

  • 26 Jan 2021 02:00 PM (IST)

    जुन्या दिल्लीकडे शेतकरी रवाना, राजपथावर जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न

    आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी आयटीओ येथील मंडी हाऊस जवळ रोखण्यात यश मिळालं आहे. शेतकरी राजपथाकडे जाऊ नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.

  • 26 Jan 2021 01:58 PM (IST)

    ITO येथे पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले

    ITO येथे पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले

  • 26 Jan 2021 01:56 PM (IST)

    शेतकरी आंदोलन थांबणार नाही, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची माहिती

    शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवलं जाणार नाही, अशी घोषणा केली. आजची ट्रॅक्टर रॅली फक्त शेतकऱ्यांमधील असंतोष दाखवण्यासाठी होती. त्यांनी ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसा झाल्याची माहिती नसल्याचं सांगितलंय.

  • 26 Jan 2021 01:51 PM (IST)

    किसान ट्रॅक्टर रॅली लाल किल्ल्यावर पोहोचली

    किसान ट्रॅक्टर रॅली लाल किल्ल्यावर पोहोचली

  • 26 Jan 2021 01:47 PM (IST)

    आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्सद्वारे बॅरिकेटस हटवले

    आंदोलकांनी बॅरिकेटस सोडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला

    Farmers Protest Delhi

    आंदोलकांनी बॅरिकेटस सोडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला

  • 26 Jan 2021 01:45 PM (IST)

    इंद्रप्रस्थ, ITO मेट्रो गेट बंद, शेतकरी पोलिसांमधील संघर्ष चिघळला

    दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी ITO येथे दगडफेक केली आहे. शेतकरी आणि पोलिसांमधील संघर्षाला हिंसक वळण लागलं आहे.

Published On - Jan 26,2021 9:50 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.