Farooq Abdullah: ‘हर घर तिरंगा’ अभियानवर फारूख अब्दुल्ला म्हणाले ते तुमच्या घरात ठेवा ; अब्दुल्ला यांचा नेमका टोमणा कोणाला…

नॅशनल कॉन्फ्रन्सचे प्रमुखानी दिलेल्या एका प्रश्नाचे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फारुक अब्दुल्ला श्रीनगरमधील बाजारामध्ये एका दुकानात गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी आलेल्या पत्रकारानी त्यांना हर घर तिरंगा या अभियानाबद्दल प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, ते तुमच्या घरामध्येच ठेवा.

Farooq Abdullah: 'हर घर तिरंगा' अभियानवर फारूख अब्दुल्ला म्हणाले ते तुमच्या घरात ठेवा ; अब्दुल्ला यांचा नेमका टोमणा कोणाला...
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:41 PM

नवी दिल्लीः जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला (Jammu and Kashmir Chief Minister Farooq Abdullah) यांना ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) या अभियानावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आणि त्यांनी त्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावेळी फारूख अब्दुल्ला यांनी काश्मिरी भाषेत उत्तर दिलं त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, ते तुमच्या घरात ठेवा. जम्मू काश्मिरमधील ग्रामीण परिसरात हर घर तिरंगा याविषयी सूचना जाहीर करण्यात आली, त्यामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांना अवाहन करण्यात आले आहे. त्या अवाहनविषयी बोलताना त्यांनी दिलेलं उत्तर सोशल मीडियावर मात्र प्रचंड व्हायरल झालं आहे.

फारूख अब्दुल्ला श्रीनगरच्या बाजारातील एका दुकानात गेले होते, त्यावेळी बाजारात असलेल्या पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून बंडावून सोडेल होते. त्यावेळी त्यांना पहिला प्रश्न हा युपीएच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, यशवंत सिन्हा 9 जुलै रोजी काश्मीर दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळी पत्रकार परिषद घेणार आहेतच.

मेहबूबा मुफ्तींचे वादग्रस्त वक्तव्य

काश्मीरमधील कलम 370 आणि 35A मध्ये बदल करण्यापूर्वी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही एकदा तिरंग्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर ते म्हणाले होते की, एवढ्या संकटानंतरही इथले लोक भारताचा ध्वज हातात धरतात, पण जर काश्मीरमधून कलम 35A हटवले तर इथे तिरंग्याला कोणी हातही लावणार नाही.

केंद्राची ‘तिरंगा’ मोहीम काय आहे?

केंद्र सरकारने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मोहिमेतंर्गत नागरिकांनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहानही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा

यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत लोकांना घरांवर आणि संस्थांमध्ये तिरंग्याचे ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसमवेत राष्ट्रीय उत्सव म्हणूनही साजरा करण्याचेही आवाहन केले आहे. त्याबद्दलही त्यांना विचारण्यात आले होते.

राष्ट्रपतींचे उमेदवारी नाकारली गेली

पहिल्या यूपीएच्या बैठकीत, यूपीएच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून फारूक अब्दुल्ला यांनाच बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यावेळी निवडणुका लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी त्यांनी आपण जम्मू-काश्मिरचा माजी मुख्यमंत्री असल्या कारणाने त्याबद्दल गांभार्याने विचार केल्यावर असं लक्षात आलं की, जम्मू काश्मीर आता एका कठीण परिस्थिती आणि एका वाईट काळातून वाटचाल करत आहे. आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी काश्मिरला माझी गरज असल्याचे सांगितले. यूपीएच्या बैठकीत माझे नाव सुचवण्यात आल्यानंतर मी नम्रतापूर्वक माझे नाव मी माघार घेतले आहे. यावेळी त्यांनी सांगितले माझ्या नावाचा ममता बॅनर्जी यांनी गांभीर्याने विचार केल्याबद्दल आपण ममता बॅनर्जी यांचे आभार मानत आहे. त्याचबरोबर ज्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला त्यांचाही मी आभार मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.