केंद्र सरकारने काही केलं तरी विरोध करायचा ही फॅशन; शेतकरी आंदोलनावर भडकले ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन

पुढच्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणारे मेट्रो मॅन ई श्रीधरन दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भडकले आहेत. ('Fashionable to oppose whatever Centre does': Metro man E Sreedharan)

केंद्र सरकारने काही केलं तरी विरोध करायचा ही फॅशन; शेतकरी आंदोलनावर भडकले 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 7:34 AM

त्रिवेंद्रम: पुढच्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणारे मेट्रो मॅन ई श्रीधरन दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भडकले आहेत. केंद्र सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध करण्याची आजकाल एक फॅशन झाली आहे. एक तर शेतकऱ्यांनी कृषी कायदे समजून घेतलेले नाहीत किंवा राजकीय कारणास्तव त्यांना हे कायदे समजून घ्यायचे नाहीयेत. सरकार काहीही करायला जाते तेव्हा त्याला दुर्देवाने विरोध होतो, असं ई श्रीधरन यांनी सांगितलं. (‘Fashionable to oppose whatever Centre does’: Metro man E Sreedharan)

श्रीधरन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. परदेशात राहून सरकारची बदनामी करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे सत्ते विरुद्धातील युद्धा सारखंच आहे. जर संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देशाच्या विरोधातच दुरुपयोग होत असेल तर हे थांबलं पाहिजे, असं ते म्हणाले.

पुढच्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश

88 वर्षीय ई श्रीधरन मेट्रो मॅनच्या नावाने प्रसिद्ध आहेत. पुढच्या आठवड्यात ते जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यंदा एप्रिल-मेमध्ये केरळ विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे श्रीधरन यांच्या भाजप प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी आपल्याला राज्यपाल बनण्यात रस नसून मुख्यमंत्री बनायचं असल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण मुख्यमंत्रीपद सांभाळू. पण सध्या पक्षाला सत्तेत आणणं हेच आपलं उद्दिष्टं असल्याचं त्यांनी सांगितलंय. केरळता भाजप जिंकल्यास राज्याच्या आधारभूत ढाच्याचा विकास करण्यात येईल. राज्यात नवे उद्योग आणू आणि मलयाळम व्यक्तीवरील कर्जाचा बोझा दूर करू, असंही त्यांनी म्हटलं होतं.

कोण आहेत श्रीधरन?

श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी ते निवडणूक लढणार की नाही? याबाबत काहीच खुलासा झालेला नाही. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिकृत सुरुवात होणार आहे. श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. अनेक शहरातील रेल्वेंचा वेग वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी देशातील अनेक रेल्वे प्रकल्प हातात घेतले आणि वेळेतही पूर्ण केले. दिल्ली असो की कोलकाता आदी अनेक शहरांमध्ये मेट्रो घेऊन जाण्याचं श्रेय श्रीधरन यांनाच जातं. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबाबत विदेशातही त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.

56 वर्षांची कारकीर्द

ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. सध्या त्यांचं वय 89 वर्षे असून त्यांना 58 वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहेत. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते.

विविध पुरस्कारांनी सन्मानित

ई.श्रीधरन यांना भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केले आहे. फ्रान्स सरकारनं देखील श्रीधरन यांना 2005 मध्ये पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार दिला आहे. (‘Fashionable to oppose whatever Centre does’: Metro man E Sreedharan)

2017 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी नाव चर्चेत

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही. राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत या माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या, असं म्हटलं होते. जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन, असंही ते म्हणाले होते. (‘Fashionable to oppose whatever Centre does’: Metro man E Sreedharan)

संबंधित बातम्या:

राज्यपाल होणार?… छे छे… भाजपची केरळात सत्ता आल्यास मुख्यमंत्री व्हायचंय: ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन

मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

(‘Fashionable to oppose whatever Centre does’: Metro man E Sreedharan)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.