AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फादर ऑफ अग्नि मिसाईल’ राम नारायण अगरवाल यांचे निधन, 83 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, देशाने महान सुपूत्र गमावला

प्रख्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ आणि "अग्नी क्षेपणास्त्रांचे जनक" राम नारायण अग्रवाल यांचे वयाच्या 83 व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले.

'फादर ऑफ अग्नि मिसाईल' राम नारायण अगरवाल यांचे निधन, 83 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, देशाने महान सुपूत्र गमावला
डॉ. राम नारायण अगरवाल
| Updated on: Aug 15, 2024 | 10:25 PM
Share

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) चे संशोधक आणि क्षेपणास्त्र तज्ज्ञ पद्मश्री आणि पद्मभूषण डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे हैदराबाद येथील निवासस्थानी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना भारताच्या क्षेपणास्र कार्यक्रमाचे आधारस्तंभ म्हटले जात होते. त्यांनी अग्नी क्षेपणास्त्रांची निर्मिती महत्वाचे कार्य केल्याने त्यांच्या निधनाने देशाने एका महापुरुषाला गमावल्याची प्रतिक्रीया डीआरडीओचे माजी प्रमुख आणि क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ डॉ. जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. अग्रवाल यांनी 1983 मध्ये डीआडीओचे प्रकल्प संचालक म्हणून दोन दशकांहून अधिक काळ देशाच्या महत्त्वाकांक्षी अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व केले होते. मे 1989 मध्ये तंत्रज्ञान प्रात्यक्षिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यासाठी त्यांनी टीमला प्रेरणा दिली.1995 मध्ये त्यांची अग्नी 2 च्या शस्त्रास्त्रे आणि तैनातीसाठी अग्नीचे कार्यक्रम संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर क्षेपणास्त्राच्या विविध आवृत्त्या विकसित केल्या गेल्या आणि त्यांचा सैन्य दलात समावेश झाला आहे. अग्नी – 5 हे क्षेपणास्र आण्विक-सक्षम असून मध्यवर्ती-श्रेणी बॅलेस्टीक क्षेपणास्त्रात 5000 किमीच्या पलीकडील लक्ष्यांवर मारा करण्याची अग्नि क्षेपणास्राची क्षमता आहे.

डॉ अग्रवाल 2005 मध्ये प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL), हैदराबादचे संस्थापक आणि संचालक म्हणून निवृत्त झाले. डॉ.अग्रवाल हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ होते.त्यांनी डॉ. अरुणाचलम आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासमवेत अग्नी आणि इतर क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर काम केले होते. 22 वर्षांच्या कार्यकाळात क्षेपणास्त्रांसाठी कवच, जहाजावरील मिसाईल प्रणाली, मार्गदर्शन आणि नियंत्रण आदी कामे त्यांनी केली.

आंतरखंडीय क्षेपणास्र क्लबमध्ये भारताला स्थान

1995 मध्ये त्यांना अग्नी – 2 मिसाईलला अण्वस्रवाहू करणे आणि त्याची सैन्य दलात तैनाती करण्याच्या कार्यक्रम संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. 1999 मध्ये 4 वर्षांच्या आत, डॉ. अग्रवाल आणि टीमने अग्नी – 1 पासून अधिक क्षमतेच्या स्ट्राईक रेट अंतरासह रोड-मोबाईल प्रक्षेपण क्षमतेसह नवीन आवृत्ती तयार केली. त्यानंतर अधिक संहारक अग्नी -3 क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीच्या प्रात्यक्षिकाने भारताला सर्व प्रणाली स्वदेशी विकसित करण्याच्या सामर्थ्यांसह लांबपल्ल्याची आण्विक – सक्षम क्षेपणास्त्र शक्ती असलेल्या देशांच्या निवडक क्लबमध्ये स्थान मिळविण्यात त्यांचा मोठा हाथ होता. भारत सरकारने 1983 मध्ये सुरू केलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करू इच्छित असलेल्या 5 क्षेपणास्त्रांपैकी ‘अग्नी क्षेपणास्त्र’ हे सर्वात महत्त्वाकांक्षी होते. पृथ्वी, आकाश, नाग आणि त्रिशूल ही क्षेपणास्रे देखील महत्वाची आहेत.

भारतमातेने महान सुपूत्र गमावला

डॉ अग्रवाल यांना महान कार्यासाठी पद्मश्री आणि  पद्मभूषण यांसह अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  पंतप्रधानांच्या हस्ते एरोस्पेस आणि अग्नी क्षेत्रातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार 2004; DRDO टेक्नॉलॉजी लीडरशिप अवॉर्ड, चंद्रशेखर सरस्वती नॅशनल एमिनेन्स अवॉर्डसह पंतप्रधान, पीव्ही नरसिंह राव आणि भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी आणि बिरेन रॉय स्पेस सायन्सेस अवॉर्ड आदीचा समावेश आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.