राजीव गांधी फाऊंडेशनवर केंद्राचा हातोडा; परवानाच केला रद्द…

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीचाही गैरवापर केला गेला असल्याचेही म्हटले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 100 कोटींची देणगी दिल्याचे सांगितले होते.

राजीव गांधी फाऊंडेशनवर केंद्राचा हातोडा; परवानाच केला रद्द...
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 3:57 PM

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची नुकतीच निवड झाली आहे, तर दुसरीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जोरदारपणे सुरु आहे. काँग्रेस आपले अस्तित्व सिद्ध करु पाहत असतानाच केंद्र सरकारने मात्र आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दोन स्वयंसेवी संस्थांचे (NGO) एफसीआरए परवाने रद्द केले आहेत. ज्या पक्षाच्या दोन एनजीओंचा ‘फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट’ परवाना रद्द करण्यात आला आहे, त्यामध्ये राजीव गांधी फाउंडेशन (RGF) आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) यांचा समावेश आहे. या स्वयंसेवी संस्थांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाकडून ही कारवाई केली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईनंतर भाजपचे (BJP) प्रवक्ते संबित पात्राने काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे, ते म्हणाले काँग्रेसला चीनकडून पैसा मिळत असल्यानेच ही कारवाई केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गृहमंत्र्यालयाकडून आज भ्रष्टाचार उघड केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या गांधी घराण्यातील दोन स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालण्याचे काम गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. याप्रकरणी 50 लाख रुपये जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. .

या कारवाईबद्दल भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपचे प्रवक्ते म्हणाले, की, भारतीय जनता पक्षाकडून आरजीएफचा दुसरा घोटाळाही उघड करण्यात आला आहे.

यामध्ये पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीचाही गैरवापर केला गेला असल्याचेही म्हटले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 100 कोटींची देणगी दिल्याचे सांगितले होते.

तसेच देणग्या देणाऱ्या सुमारे 11 कंपन्या असून त्याकंपन्यांकडून सोनिया गांधींच्या एनजीओला पैसे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

चीनसह परदेशातून निधी प्राप्त करताना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना मनी लाँड्रिंग, निधीचा गैरवापर आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला गेला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या एनजीओच्या अध्यक्ष आहेत.

राजीव गांधी फाऊंडेशनच्या इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, माँटेक सिंग अहलुवालिया, सुमन दुबे आणि अशोक गांगुली यांचाही त्यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये राहुल गांधी, अशोक गांगुली, बन्सी मेहता आणि दीप जोशी यांचा समावेश आहे. राजीव गांधी फाऊंडेशनच्या वेबसाइटनुसार त्याची स्थापना 1991 मध्ये झाली आहे.

तर 1991 ते 2009 पर्यंत, या फाऊंडेशनने महिला, मुले आणि अपंग लोकांना मदत करण्याव्यतिरिक्त आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात काम केले आहे.

राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना ही 2002 मध्ये केली गेली होती. त्याद्वारे देशातील वंचित घटकांच्या, विशेषतः खेड्यांमध्ये राहणाऱ्या गरीबांच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे

गृह मंत्रालयाने जुलै 2020 मध्ये प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA), आयकर कायदा आणि FCRA च्या संभाव्य उल्लंघनांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक आंतर-मंत्रालयीय समिती स्थापन केले. त्यामुळे या समितीची नजर या एनजीओव असल्याचे सांगण्यात आले आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.