Fifth fodder scam case: लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षाची शिक्षा, डोरंडा कोषागार घोटाळ्या प्रकरणी कोर्टाचा निर्णय

डोरंडा कोषागारशी (fodder scam case) संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निकाल दिला.

Fifth fodder scam case: लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षाची शिक्षा, डोरंडा कोषागार घोटाळ्या प्रकरणी कोर्टाचा निर्णय
लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षाची शिक्षा, डोरंडा कोषागार घोटाळ्या प्रकरणी कोर्टाचा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 2:30 PM

रांची: डोरंडा कोषागारशी (fodder scam case) संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निकाल दिला. लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा देतानाच त्यांना 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्या वकिलांनी लालूंना जामीन मिळावा म्हणून अर्ज करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, लालूंना जामीन न मिळाल्यास त्यांना तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सीबीआयच्या विशेष कोर्टाने (CBI court) 15 फेब्रुवारी रोजी लालूप्रसाद यादव यांच्यासह इतर आरोपींना डोरंडा कोषागार संबंधित चार घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. हा 139.5 कोटींचा घोटाळा होता. त्यावेळी कोर्टाने शिक्षा सुनावली नव्हती. आज या प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली असून लालूंसाठी हा निकाल मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात ऑनलाईन सुनावणी झाली. या ऑनलाईन सुनावणीला लालूप्रसाद यादवही उपस्थित होते. या पूर्वीही लालूंना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेलं आहे. सध्या लालू जामिनावर आहेत. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे. लोअर कोर्ट आणि ट्रायल कोर्टाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर काही शिक्षा भोगल्यानंतर त्यांनी आरोग्याचं कारण देत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला होता.

काय आहे डोरंडा कोषागार प्रकरण?

1996 साली तब्बल 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा उघडकीस आला आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 1990 ते 1995 या कालावधीत हा घोटाळा घडला होता. या संबंधित पाच प्रकरणांमध्ये डोरंडा कोषागारचा घोटाळाचा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. अन्य चार प्रकरणांत चाईबासा कोषागारातून एकावेळी 37.7 कोटी रुपये आणि दुसर्‍या वेळी 33.13 कोटी रुपये काढण्यात आले होते. तसेच देवघर कोषागारातून 89.27 कोटी रुपये आणि दुमका कोषागारातून 36 कोटी रुपयांची रक्कम अवैधरित्या काढण्यात आली होती. लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन विभागातील निधीचा गैरव्यवहार उघडकीस आला होता.

संबंधित बातम्या:

Rescue operation video : खडकाळ कड्यावरून 300 फूट खाली कोसळला युवक पण हवाईदलानं वाचवलं, पाहा थरार

Bajrang Dal activist Murder | कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, हिजाबविरोधी पोस्टमुळे खुनाचा आरोप

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.