मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; सणांसाठी आगाऊ रक्कम आणि LTC कॅश व्हाऊचर्स
केंद्र सरकारकडून फेस्टिव्हल अॅडव्हान्स योजना पुन्हा सुरु करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
नवी दिल्ली: कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही नव्या घोषणा केल्या आहेत. या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील मागणी वाढवण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी LTC Cash Voucher आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स या दोन प्रमुख योजना जाहीर केल्या.
काय आहे LTC Cash Voucher योजना? LTC Cash Voucher योजनेतंर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कॅश व्हाऊचर्स मिळतील. या व्हाऊचर्सच्या साहाय्याने संबंधित कर्मचाऱ्याला 12 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक जीएसटी कर असणाऱ्या वस्तू खरेदी करता येतील. मात्र, हे सर्व व्यवहार ऑनलाईन करणे बंधनकारक असेल.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. या व्हाऊचर्सचा वापर करून कर्मचाऱ्यांना ट्रेन किंवा विमानाचे तिकीट खरेदी करता येईल. यासाठी तिकीटाची रक्कम आणि अन्य खर्च तीनपट असायला पाहिजे. या माध्यमातून अर्थव्यवस्थेत 28 हजार कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
Under LTC Cash Voucher Scheme, government employees can opt to receive cash amounting to leave encashment plus 3 times ticket fare, to buy items which attract GST of 12% or more. Only digital transactions allowed, GST invoice to be produced: FM Nirmala Sitharaman https://t.co/Fn24PBb8KQ pic.twitter.com/8G33LwVzGU
— ANI (@ANI) October 12, 2020
सणांच्या काळात मिळणार आगाऊ रक्कम केंद्र सरकारकडून फेस्टिव्हल अॅडव्हान्स योजना पुन्हा सुरु करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात 10 हजाराची रक्कम आगाऊ मिळेल. यानंतर कर्मचाऱ्यांना 10 हप्त्यात या रकमेची परतफेड करता येईल.
If Central govt employees opt for it, this will cost around Rs 5,675cr. The employees of PSBs & PSUs allowed to avail this facility, and for PSBs & PSUs the cost will be Rs 1,900 crores. The demand infusion in the economy by central govt & PSUs will be approx Rs 19,000 cr: FM pic.twitter.com/q3YDf00PxJ
— ANI (@ANI) October 12, 2020
अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत अनेक महिन्यांच्या घसरणीनंतर आता भारतीय अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील परिस्थिती सुधारत आहे. तसेच वीजेची मागणीही वाढली आहे.
संबंधित बातम्या:
रुपयाची घसरगुंडी, ऑटो इंडस्ट्रीत मंदी, अर्थव्यवस्था घसरण्याची कारणं
भारतीय अर्थव्यवस्था एकाच व्यक्तीने चालवणं घातक : रघुराम राजन