AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!

अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन (TV Somanathan) यांनी आरोग्य सेवा क्षेत्र (Healthcare Sector) हा राज्यांच्या जबाबदारीचा विषय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य बजेटवरुन केंद्र व राज्यांत वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!
मधुमेहाच्या रुग्णांनी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे सेवन केले जात असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 6:04 PM

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पात (UNION BUDGET) आरोग्य क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद नसल्याच्या मुद्द्यावर केंद्राची भूमिका समोर आली आहे. अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन (TV Somanathan) यांनी आरोग्य सेवा क्षेत्र (Healthcare Sector) हा राज्यांच्या जबाबदारीचा विषय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य बजेटवरुन केंद्र व राज्यांत वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादरीकरण केल्यानंतर आरोग्य सेवा क्षेत्राच्या निधीबाबत आरोग्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात होती. केंद्र सरकार आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यावर निधी खर्च करत आहे. जीडीपीच्या 1.3 टक्के पैसे आरोग्य क्षेत्रासाठी वर्ग करण्यात आले आल्याचं सोमनाथ यांनी सांगितले. दुर्बल आर्थिक घटकातील नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सरकारने हाती घेतल्याचे सोमनाथ यांनी म्हटलं आहे.

जीडीपीच्या 3 टक्के:

आर्थिक वर्ष 2022-23 अर्थसंकल्पानुसार, सरकार आरोग्य सेवा क्षेत्रावर 83,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत समान रक्कम आहे. मात्र, कोविडचा प्रकोप अद्याप कायम असल्याने आरोग्य क्षेत्रासाठी अधिक निधीची मागणी समोर येत आहे. भारतीय उद्योग महासंघाने अर्थसंकल्पावर उद्योजक-अधिकाऱ्यांचं चर्चासत्र आयोजित केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह बडे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही.नरेंद्र यांनी आरोग्यावर जीडीपीच्या तीन टक्के खर्च करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

आरोग्य क्षेत्राचं खासगीकरण?

अर्थ सचिवांनी आरोग्य क्षेत्राच्या प्रश्नांवर आकडेवारीचा दाखला दिला. कोविड प्रकोपाच्या काळात थकित कर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सर्व क्षेत्रांसाठी सरकारने योजना हाती घेतली होती. यामध्ये आरोग्य क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात योजनेमधून आर्थिक लाभ मिळवून देण्यात आल्याचे अर्थ सचिवांनी म्हटलं आहे. खासगी क्षेत्रांनी आरोग्याच्या क्षेत्रात लक्ष घालण्याचं आवाहन वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे.

डिजिटल इकोसिस्टम:

अर्थमंत्री निर्मला सीतारमन केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला होता. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प ठरला होता. अर्थमंत्री सीतारमन नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल अशी घोषणा केली होती. आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांसाठी डिजिटल नोंदणीचा समावेश असेल.

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.