Vande Metro : वंदे मेट्रोचा पहिला लूक, व्हिडिओ आला समोर, मुंबईत होणार दाखल
Vande Metro : पहिल्या टप्प्यात ही ट्रेन मुंबईत सुरू होणार आहे. कारण मुंबईत लोकल गाड्यांना मोठी मागणी आहे. मुंबईनंतर राजधानी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथेही वंदे मेट्रो चालवण्याची योजना आहे.
देशात वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमधून आता शंभरापेक्षा जास्त वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे वंदे भारत मेट्रो ट्रेनही सुरु होणार आहे. लोकल गाड्यांच्या धर्तीवर वंदे मेट्रो धावणार आहेत. वंदे मेट्रोची पहिली झलक एका व्हिडिओतून समोर आली आहे. पंजाबमधील कपूरथला रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत मेट्रोचे कोच तयार होत आहे. यावर्षी जुलै महिन्यात वंदे मेट्रो ट्रेन रुळावर धावणार आहे.
वंदे मेट्रोमध्ये 12 कोच असणार
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 50 वंदे मेट्रो ट्रेन बनवण्याचे काम सुरु आहे. हळहळू त्यांची संख्या 400 पर्यंत जाणार आहे. वंदे मेट्रो ट्रेनचा वेग 100 किमी ते 250 किमीपर्यंत असणार आहे. या ट्रेनमध्ये डिफॉल्टर कॉन्फिगरेशनप्रमाणे 12 कोच असणार आहे. परंतु त्याची संख्या वाढवून 16 कोचपर्यंत करता येणार आहे. वंदे भारत ट्रेन प्रमाणे वंदे मेट्रे ट्रेनही देशात विकसित करण्यात आलेली ट्रेन आहे. हिला सेमी हाई स्पीड इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट ट्रेन म्हणता येणार आहे. ही ट्रेन वंदे भारत ट्रेनचा मेट्रो व्हर्जन आहे.
मुंबईतून होणार सुरुवात
रेल्वे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, पहिल्या टप्प्यात ही ट्रेन मुंबईत सुरू होणार आहे. कारण मुंबईत लोकल गाड्यांना मोठी मागणी आहे. मुंबईनंतर राजधानी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथेही वंदे मेट्रो चालवण्याची योजना आहे. या ट्रेनला 4, 8, 12 आणि 16 डबे असू शकतात. मात्र, ही ट्रेन 12 डब्यांची मुंबईत सुरू होणार आहे.
First Basic until of Vande Metro from RCF Kapurtala is flagged for run trials on 30-04-2024. The train has features similar to Vandebharat trains.
Adding a new dimension to train travel over IR.#IR#IndianRailways pic.twitter.com/m9yBE22Zf5
— Ajay Singh (@railwaterman) May 1, 2024
असे असणार संरक्षण
वंदे मेट्रो एकमेकांवर धडकणार नाही, अशी प्रणालीने सुसज्ज आहे. वंदे मेट्रोमध्ये एसी, स्वयंचलित दरवाजे, एलईडी दिवे, वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह आणि प्रवासी माहिती प्रणाली अशा अनेक सुविधा आहेत. दिल्ली-मेरठ, दिल्ली-गाझियाबाद, मुंबई-ठाणे, आग्रा-मथुरा अशा व्यस्त मार्गांवर वंदे भारत सुरू करण्याची योजना आहे. या ट्रेनचे भाडे किती असणार आहे, यासंदर्भात निर्णय झाला नाही.