AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack पाकिस्तानी सैन्याचं थेट कनेक्शन, पहिला मोठा पुरावा मिळाला, हाशिम मूसाबद्दल मोठा खुलासा

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी सैन्याच या हल्ल्याशी थेट कनेक्शन आहे. या दहशतवादी हल्ल्यातील एक हल्लेखोर हाशिम मूसाबद्दल मोठा खुलासा झाला आहे.

Pahalgam Terror Attack पाकिस्तानी सैन्याचं थेट कनेक्शन, पहिला मोठा पुरावा मिळाला, हाशिम मूसाबद्दल मोठा खुलासा
Pahalgam Terror Attackers Photo
Follow us
| Updated on: Apr 29, 2025 | 12:20 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाचा पाकिस्तानी सैन्याशी थेट संबंध आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम मूसा दहशतवादी बनण्याआधी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हाशिम मूसाचा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने मिळून मूसाने पहलगाम दहशतवादी हल्ला प्रत्यक्षात आणला. हाशिम मूसाला लश्कर-ए-तैयबाने प्रशिक्षण देऊन कश्मीरला पाठवलं होतं. मूसाने इथे येऊन तीन स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने संपूर्ण घटना प्रत्यक्षात आणली अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोणाला संशय येऊ नये यासाठी हल्ल्याच्यावेळी मूसा आणि त्याच्या साथीदारांनी आर्मीचा ड्रेस परिधान केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी त्यांन पर्यटकांवर हल्ला केला. काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदा पर्यटकांवर इतका मोठा हल्ला झालाय. सूत्रांनी सांगितलं की, मूसाच ISI शी थेट कनेक्शन आहे. त्यांच्याच सांगण्यावरुन तो लश्कर ए तैयबामध्ये सहभागी झाला होता.

पाकिस्तानच्या वरिष्ठ पत्रकाराचा सनसनाटी आरोप

मूसा याआधी सुद्धा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. मूसाने कोवर्ट ऑपरेशन्समध्ये ट्रेनिंग केलय. मूसाचा खात्मा हा भारतीय सैन्याचा पहिला प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आदिल राजा यांनी मोठा दावा केला आहे. आदिल यांच्यानुसार मुनीर यांच्या सांगण्यावरुन हा हल्ला करण्यात आला. मुनीर यांना पाच वर्षांचा कार्यकाळ हवा आहे. म्हणून त्यांनी भारताविरोधात तणाव निर्माण केला आहे असं आदिल यांनी पोस्टमध्ये म्हटलय.

हल्ल्याच्या तीन दिवस आधी भाषण

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसआधी मुनीर यांनी एक भाषण केलं होतं. या भाषणात मुनीर यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. म्हणून पहलगाम हल्ल्यासाठी मुनीर यांना जबाबदार धरलं जात आहे.

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.