प्रचंड गोंधळ ! आधी काँग्रेस उमेदवार विजयी घोषित, फेरमतमोजणीत मात्र भाजपचा उमेदवार १६ मतांनी विजयी

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला जल्लोष मात्र फेरमतमोजणीच्या निकालाने आनंदावर पाणी फेरलं. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ.

प्रचंड गोंधळ ! आधी काँग्रेस उमेदवार विजयी घोषित, फेरमतमोजणीत मात्र भाजपचा उमेदवार १६ मतांनी विजयी
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 10:47 AM

Karnatak Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी मोठी संजीवनी ठरला आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसने 135 जागा जिंकून भाजपचा पराभव केला. भाजपला 66 जागा मिळाल्या तर जेडीएसच्या खात्यात 19 जागा गेल्या. पण या दरम्यान अशी एक जागा होती जिथे मतमोजणीदरम्यान प्रचंड गोंधळ झाला. कारण या जागेवर आधी काँग्रेसच्या उमेदवाराला 160 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मात्र नंतर झालेल्या फेरमतमोजणीत भाजपचा उमेदवार 16 मतांनी विजयी झाला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला.

भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

कर्नाटकातील जयनगर मतदारसंघातील ( jayanagar assembly constituency ) एसएसएमआरव्ही कॉलेजच्या मतमोजणी केंद्रावर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. भाजपचे उमेदवार सीके राममूर्ती यांच्या विरोधात रामलिंगा रेड्डी यांची कन्या सौम्या रेड्डी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या.दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. फेरमतमोजणीत मात्र भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला.

मतमोजणी केंद्रावर मोठे नेते पोहोचले

मतमोजणी झाल्यानंतर काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांना 160 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मात्र भाजपचे उमेदवार सीके राममूर्ती यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मतमोजणी केंद्रावर त्यांच्यासोबत भाजपचे खासदार आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याही उपस्थित होते. याला मात्र सौम्या रेड्डी आणि त्यांचे वडील रामलिंगा रेड्डी यांनी विरोध केला. या गोंधळादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमारही तेथे पोहोचले आणि त्यांनी विरोध सुरू केला.

फक्त १६ मतांनी विजय

पण अखेर मतमोजणी केंद्रावर पुन्हा मतमोजणी सुरू झाली आणि यावेळी भाजपचे उमेदवार सीके राममूर्ती फक्त १६ मतांनी विजयी झाले. रात्री उशिरा या जागेचा निकाल जाहीर झाला. फेरमतमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर काँग्रेसने अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप केला. रामलिंगा रेड्डी म्हणाले की, सरकारी यंत्रणेचा सीके राममूर्तींना फायदा झाला आहे. सीके राममूर्ती यांना ५७,७९७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सौम्या रेड्डी यांना ५७,७८१ मते मिळाली.

राहुल गांधी यांना विजयाचे श्रेय

काँग्रेस देशभरात कर्नाटकच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना देत आहेत. 2014 पासून आतापर्यंत 50 हून अधिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. मात्र गेल्या ६ महिन्यांतील काँग्रेसचा हा दुसरा मोठा विजय आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.