अबब! तब्बल सहा तास विमान खोळंबले, शेजारच्या प्रवाशाच्या गर्लफ्रेंडचा मेसेज पाहून महिलेची बोंबाबोंब, नेमकं काय घडलं?
या तरुणाच्या शेजारी बसलेल्या महिलेने त्याच्या फोनवरील व्हॉट्सअपमध्ये तो मेसेज पाहिल्यानंतर, तीने केबिन क्रूकडे जाऊन या तरुणाची तक्रार केली. हा संशयीत दहशतवादी असल्याचे तिला वाटले. त्यानंतर विमानातील चालक दलाने एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क केला. त्यानंतर या तरुणाची चौकशी करण्यात आली
बंगळुरु – एका क्षुल्लक कारणामुळे मंगळुरुहून मुंबईकडे येणारे विमान सहा तास उशिराने उडाले. विमानात बसलेल्या एका महिलेने शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या व्हॉट्सअपवर बॉम्बर असे लिहिलेले पाहिले. या मेसेज पाहिल्यानंत महिला अस्वस्थ झाली आणि तिने गोँधळ घालायला सुरुवात केली. ही माहिती विमानतळावीरल प्रशआसनापर्यंत पोहचली, त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांचे सामान पुन्हा एकदा तपासण्यात आले. त्यात काहीही संशयास्पद सापडले नाही. त्यानंतर तिच्या शेजारी बसलेल्या तरुणाची चौकशी करण्यात आली, त्यात जे कारण त्याने सांगितले त्याने पोलीसही हैराण झाले. हा तरुण त्याच्या गर्ल्डफ्रेंडशी चॅटिंग करीत होती. त्यावेळी गर्लफ्रेंडने त्याच्यासाठी बॉम्बर असा शब्दप्रयोग केला होता.
संशयावरुन महिला प्रवाशाने केली तक्रार
या तरुणाच्या शेजारी बसलेल्या महिलेने त्याच्या फोनवरील व्हॉट्सअपमध्ये तो मेसेज पाहिल्यानंतर, तीने केबिन क्रूकडे जाऊन या तरुणाची तक्रार केली. हा संशयीत दहशतवादी असल्याचे तिला वाटले. त्यानंतर विमानातील चालक दलाने एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क केला. त्यानंतर या तरुणाची चौकशी करण्यात आली. त्याच त्याने सांगितले की तो त्याच्या गर्लफ्रेंडशी चॅटिंग करीत होता. त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच विमानतळावरुन बंगळुरुला जाणारी फ्लाईट पकडायची होती. मात्र इतके सांगितल्यानंतरही या प्रवाशाला त्या विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली.
६ तास लेट झालेल्या विमानाने संध्याकाळी ५ वाजता केले टेक ऑफ
संपूर्ण तपासणी झाल्यानंतर १८५ प्रवाशांना या विमानात संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा बसवण्यात आले. तर संबंधित संशयीत तरुणाच्या केलेल्या चौकशीत काहीही हाती लागले नसलव्याची माहिती स्थानिक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. तो केवळ त्याच्या गर्लफ्रेंडशी चॅटिंग करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२२ जुलै रोजीही एक फ्लाईट थांबवण्यात आले होते
अशीच एक घटना २२ जुलै रोजी पटना एयपोर्टवरही घडली होती. पटन्याहून दिल्लीला येणारी ही इंडिगोची फ्लाईट होती. प्रवासी विमानात बसले होते. वमानाचे गेट बंद होणार होते. त्यावेळी आपल्या आई-वडिलांसोबत बसलेल्या एका २४ वर्षांच्या तरुणाने विमानातून उतरायचे आहे असा आग्रह धरला. आपल्याकडे बॉम्ब आहे, असे तो तरुण सांगत होता. या तरुणाचे हे म्हणणे प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या कानावर पडले, विमानात एकच गोँधळ उडाला. विमानतळावरही काही काळ भीतीचे वातावरण होते. दिल्लीला जाणारे १३४ प्रवासी या विमानात त्यावेळी होते. त्यानंतर तातडीने तपास पथक पाठवण्यात आले. या तरुणाची तपासणी करण्यात आली, त्यात त्या तरुणाकडे काहीही संशयास्पद सापडलेले नाही. नंतर स्पष्ट झाले की तो मानसिक अस्वस्थ असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.