Seema Haider | ‘तुम्ही सीमा हैदरची मेडिकल टेस्ट करा, तिला….’, पाकिस्तानी डॉक्टरचा धक्कादायक खुलासा
Seema Haider | सीमा हैदर आपल्याकडे ऑनलाइन कंसल्टेशन करत होती, असा दावा एका पाकिस्तानी डॉक्टरने केला आहे. त्या डॉक्टरने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्याने सीमाच्या बाबतीत राजीनामा देण्याची सुद्धा तयारी दाखवलीय.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणाची चर्चा आहे. सीमाच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सौदी अरेबियात असलेल्या सीमाच्या पतीला ती त्याच्याकडे परत येईल, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी आता सीमाला एक आजार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी यूट्यूबर सैयद बासित अलीने सीमाशी संबंधित माणसांचे इंटरव्यू करण्याचा सपाटा लावला आहे. हे सर्व सीमाशी संबंधित आहेत, असा त्याचा दावा आहे.
काही दिवसांपूर्वी सैयद बासित अलीन एक व्हिडिओ रिलीज केला होता. या व्हिडिओमधील व्यक्ती सीमा त्याची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करत होता. सीमा कोणाचीच होऊ शकत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तेच दुसऱ्या एका व्हिडिओत सीमाची बालमैत्रीण असल्याचा दावा करण्यात आला होता. आता एका डॉक्टरचा व्हिडिओ समोर आलाय. सीमावर आपण ऑनलाइन उपचार करत होतो, असा त्याचा दावा आहे.
डॉक्टरने सीमाबद्दल काय सांगितलं?
सीमा आपल्याकडे ऑनलाइन कंसल्टेशन करत होती, असा त्या डॉक्टरचा दावा आहे. “ती एंजायटी आणि डिप्रेशनची रुग्ण आहे. अशी लोकं फक्त स्वत:लाच नाही, तर दुसऱ्यांना सुद्धा अडचणीत आणू शकतात. तिच्या प्रत्येक गोष्टीत आक्रमकता असते. अशी लोकं मोबाइलमध्ये जास्त वेळ घालवतात” असं त्या डॉक्टरने इंटरव्यूमध्ये सांगितलं. “असे लोक स्वत:ला ग्रेट समजतात. जास्त ओव्हर कॉन्फिडेंट असतात. आपण काहीही करु शकतो, असं त्यांना वाटतं” असं सीमावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितलं.
डॉक्टरचे धक्कादायक दावे
“हे लोक खूप खतरनाक असतात. कोणासोबतही ते काहीही करु शकतात. त्यांच्या मार्गात अडथळ आणणाऱ्याला ते संपवू शकतात. त्यांच्यासोबत राहणाऱ्याला धोका असतो” असं या डॉक्टरच म्हणणं आहे. “सीमाला इंसोम्नियाचा आजार आहे. तिला झोप येत नाही. अशी लोकं औषधांशिवाय नाही राहू शकतं” असं पाकिस्तानी यूट्यूबरला दिलेल्या इंटरव्यूमध्ये या डॉक्टरने सांगितलं.
‘तर मी राजीनामा देईन’
“सीमाची तुम्ही मेडिकल टेस्ट करा, मी सांगतोय ते सर्व आजार समोर येतील. असं झालं नाही, तर मी राजीनामा देईन” असा दावाही या डॉक्टरने केला. फैयाज असं या पाकिस्तानी डॉक्टरच नाव आहे.