Gupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत गुप्तेश्वर पांडे यांनी जनता दल (युनायटेड) मध्ये प्रवेश केला.

Gupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 5:15 PM

पाटणा : नाही-नाही म्हणता म्हणता बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर जनता दल युनायटेडचा झेंडा हाती धरलाच. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पांडेंनी जेडीयूमध्ये प्रवेश केला. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार फेटाळून लावल्या होत्या. (Former Bihar DGP Gupteshwar Pandey joins JDU at Chief Minister Nitish Kumar residence in Patna)

पांडेंनी शनिवारीही नितीश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र पक्षप्रवेशासाठी नाही तर नितीश कुमार यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया त्यांनी भेटीनंतर दिली होती. “मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले. बिहारच्या डीजीपी पदावर असताना त्यांनी मला काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणं माझं कर्तव्य आहे” असं ते म्हणाले होते.

“माझं फायनल झालं की तुम्हाला सांगतो” असं म्हणत त्यांनी काही प्रश्न अनुत्तरित ठेवले होते. मात्र बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जेडीयूतील प्रवेशामुळे पांडेंचा निवडणूक लढवण्याचा मनसुबा उघड झाला आहे.

गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सातत्याने चर्चा सुरु होत्या. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपची कड घेणाऱ्या पांडेंवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने निशाणाही साधला होता. आता मात्र भाजपशी युती असलेल्या जेडीयूत प्रवेश करुन पांडेंनी चकवा दिला.

(Former Bihar DGP Gupteshwar Pandey joins JDU at Chief Minister Nitish Kumar residence in Patna)

बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु शकतात, अशीा शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

अखेर गुप्तेश्वर पांडे-नितीश कुमारांची भेट, पक्षप्रवेश कधी? पांडे म्हणतात…

Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!

Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

(Former Bihar DGP Gupteshwar Pandey joins JDU at Chief Minister Nitish Kumar residence in Patna)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.